Micromax In Note 2 चा टीझर आला समोर, स्मार्टफोन 25 जानेवारीला होणार लॉन्चिंग
InNote 2 (Photo Credits-Twitter)

मायक्रोमॅक्सने नव्या 4जी स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. फोन 25 जानेवारी 2022 रोजी भारतात लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने अपकमिंग स्मार्टफोन Micromax In Note 2 चा टीझर सुद्धा जाहीर केला आहे. त्यानुसार फोन दोन रंगात ऑप्शनमध्ये येणार आहे. मायक्रोमॅक्स इन नोट 2 स्मार्टफोन Dazzling glass finish मध्ये येणार आहे.

कंपनीच्या या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ग्लासचा वापर करतात. फोन पंच होल डिस्प्लेसह पातळ बेजेल्ससह येणार आहे. त्याचसोबत हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट येथून खरेदी करता येणार आहे. ब्लू आणि ब्राउनमध्ये हा उपलब्ध आहे. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनच्या रियरमध्ये In ब्रँन्डिंगचा वापर केला आहे. फोन बद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.(Amazon Great Republic Day Sale: ॲमेझॉन सेल आजपासून सुरू; मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर मिळवा मोठी सूट, जाणून घ्या खास ऑफर्स)

Tweet:

स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला जाणार आहे. तसेच 450nits चा पीक ब्राइटनेस मिळणार आहे. फोनचा ऑस्पेक्ट रेश्यो 21:9 आहे. MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या सपोर्टसह येणार आहे. फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट ही मिळणार आहे. क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला असून याचा मुख्य कॅमेरा 48MP चा आहे. या व्यतिरिक्त एक 5MP वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळणार आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. तर 5000mAh ची बॅटरी मिळणार असून 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे.