Amazon Great Republic Day Sale: ॲमेझॉन सेल आजपासून सुरू; मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर मिळवा मोठी सूट, जाणून घ्या खास ऑफर्स
Amazon (PCc - Pixabay)

Amazon Great Republic Day Sale: Amazon चा वार्षिक ग्रेट रिपब्लिक डे सेल आजपासून म्हणजेच 17 जानेवारी 2022 पासून लाइव्ह झाला आहे. हा चार दिवसांचा सेल आहे, जो 20 जानेवारी 2022 पर्यंत सुरू राहील. या कालावधीत ग्राहक स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठ्या सवलतीच्या ऑफरचा आनंद घेऊ शकतील. सेलमध्ये स्मार्टफोनवर जास्तीत जास्त 40 टक्के आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि अॅक्सेसरीजवर 70 टक्के सूट दिली जात आहे. यामध्ये SBI कार्ड्सवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट, नो-कॉस्ट EMI, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर यांचा समावेश आहे. (वाचा - Amazon Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉन घेऊन येत आहे ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’; 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळवण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या ऑफर्स )

या स्मार्टफोन्सवर खास ऑफर्स -

  • Redmi 10 Prime, iQoo Z5 आणि Samsung M52 5G डील ऑफ द डे ऑफर अंतर्गत सादर केले गेले आहेत. ज्या अंतर्गत आज रात्री 12 वाजण्यापूर्वी या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे.
  • OnePlus 9 5G सिरिज स्मार्टफोन बँक सवलत, 36,999 रुपयांची एक्सचेंज ऑफरसह येईल. Redmi Note 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G वर मोठ्या बँक सवलती दिल्या जात आहेत.
  • Redmi 9 सीरीजचे स्मार्टफोन्स 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असतील.

    Redmi Note 10S, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max आणि Redmi Note 10 Lite स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत रु. 12,999 आहे. Xiaomi 11 lite NE 5G स्मार्टफोन 21,999 रुपयांना मिळेल. Tecno Pop 5 LTE स्मार्टफोन रु. 6,299 ला येईल.

  • Samsung Galaxy M52 5G आणि Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन 7000 रुपयांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात. Samsung S20 FE 5G स्मार्टफोन 36,990 रुपयांना मिळेल. निवडलेल्या बँकेतून फोन खरेदीवर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे.
  • iQOO Z3 5G स्मार्टफोन 17,990 रुपयांना मिळेल. हाच नुकताच लाँच केलेला iQOO Z5 5G स्मार्टफोन Rs 7,000 च्या सवलतीत रु. 22,990 मध्ये मिळेल.

याशिवाय लॅपटॉप 53% डिस्काउंट ऑफरवर सेलमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.