Amazon Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉन घेऊन येत आहे ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’; 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळवण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या ऑफर्स 
Amazon | (Photo Credits: Amazon)

Amazon India ने 2022 चा आपला पहिला मेगा सेल, ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ (Amazon Great Republic Day) जाहीर केला आहे. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन उपकरणे तसेच टीव्ही आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आकर्षक सूट मिळेल. ग्राहकांना स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल, कॅमेरा आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल, Amazon Alexa, Fire TV आणि Kindle डिव्हाइसवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

या सेलमध्ये Amazon SBI कार्ड धारकांना बँक सवलत, बजाज फिनसर्व्ह वर नो-कॉस्ट EMI आणि Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनादेखील सवलत मिळेल. सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्हीवर 16,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट आणि 24 महिन्यांपर्यंतच्या विना-व्याज ईएमआयचा लाभ देखील आहे. रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यांसारख्या मोठ्या उपकरणांवर 50 टक्के सूट मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सोमवारी आपल्या ग्राहकांना Amazon च्या आगामी ग्रेट रिपब्लिक डे सेल अंतर्गत केलेल्या सर्व खरेदीवर 10 टक्के झटपट सूट आणि कॅशबॅक ऑफर करण्यासाठी, ई-कॉमर्स कंपनी Amazon सोबत हातमिळवणी केली आहे. सॅमसंग, शाओमी आणि टेक्नोच्या स्मार्टफोनसह 80 हून अधिक उत्पादने या सेलमध्ये लॉन्च केली जातील. (हेही वाचा: प्रतीक्षा संपली! बाजारात आला 'वन प्लस 10 प्रो'; जाणून घ्या फीचर्स, कॅमेरा आणि किंमत)

हा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ लवकरच येणार असल्याची घोषणा Amazon ने केली आहे. परंतु अद्याप सेलच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. सेलमध्ये अमेझॉन प्राइम सदस्यांना नियमित ग्राहकांच्या आधी 24 तास खरेदी करण्याचा लाभ मिळेल.