OnePlus 10 Pro: प्रतीक्षा संपली! बाजारात आला 'वन प्लस 10 प्रो'; जाणून घ्या फीचर्स, कॅमेरा आणि किंमत
OnePlus 10 Pro (Photo Credit : Twitter)

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असणारा वन प्लस 10 प्रो (OnePlus 10 Pro) अखेर बाजारात आला आहे. अनेक दिवसांपासून या फोनबाबत उत्सुकता होती आता ती संपली आहे. आज चीनच्या बाजारात हा फोन लॉन्च झाला आहे. या मोबाईलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने अनेक स्पेसिफिकेशन्स सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. हा नवीन स्मार्टफोन ColorOS 12 आधारित Android 12 वर काम करतो. या वर्षी कंपनीने या OnePlus फोनला नवीन डिझाइन दिले आहे. हा फोन व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट अशा दोन रंगात येतो.

OnePlus 10 Pro च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.67-इंचाचा QHD Plus OLED पॅनल आहे, जो LTPO 2.0 पॅनेल सह येतो. यात 120hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. या फोनचा स्पीड वाढवण्यासाठी कंपनीने नेहमीप्रमाणे यावेळी क्वालकॉमचा लेटेस्ट प्रोसेसर वापरला आहे. या प्रोसेसरचे नाव Snapdragon 8 Gen 1 आहे. हा प्रोसेसर 12 GB रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो.

कॅमेरा-

OnePlus 10 Pro च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे, तर 50 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. तसेच तिसरा कॅमेरा 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच, कॅमेरा सॉफ्टवेअरमध्ये नवीन हॅसलब्लॅड मास्टर स्टाईल (Hasselblad Master Style) देण्यात आली आहे, जी वापरकर्त्यांना अतिशय वेगळ्या दर्जाचे फोटो क्लिक करण्यास मदत करते.

बॅटरी-

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W वायर चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50W वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे. (हेही वाचा: Lenovo चे Smart Clock 2 भारतात लॉन्च, जाणून घ्या अलार्म सेट ते वॉइस कमांड देण्यापर्यंत कसे करते काम)

किंमत -

OnePlus 10 Pro च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची 8/128 GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 54,521 रुपये आहे. 8/256 GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 57,997 रुपये आहे. शिवाय, 12/255 GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 61,478 रुपये आहे. दरम्यान, सध्या तरी हा फोन चीनमध्ये सदार करण्यात आला आहे. परंतु भारतासह इतर देशांमध्ये तो कधी लॉन्च केला जाईल याची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.