मायक्रोमॅक्स कंपनीची In सीरिज भारतात लॉन्च केली आहे. या सीरिज अंतर्गत Micromax In Note 1 आणि Micromax In 1b स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन शानदार कॅमेरा सेटअपसह येणार आहेत. मायक्रोमॅक्स एन नोट 1 च्या रियर मध्ये 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. तर मायक्रोमॅक्स एन 1बी च्या रियर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे.(Vivo V20 SE स्मार्टफोन भारतात लॉन्च, 32MP सुपर नाइट सेल्फी कॅमेसह जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक)
Micromax In note 1 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. याच्या 6जीबी रॅम, 128जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 12,499 रुपये आहे. तर 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्स वेबसाइटच्या माध्यमातून होणार आहे. तसेच स्मार्टफोन आजपासून बुकिंग करता येणार आहे. तर पहिला सेल येत्या 24 नोव्हेंबर पासुन सुरु होणार आहे.
या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये 6.67 इंचाचा पंच होल फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. फोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड स्टॉक वर्जन ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमच्या रियर पॅनलवर क्वॉड कॅमेराग सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48mp असणार आहे. तर 5MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. त्याचसोबत 2MP मॅक्रो लेन्स दिली आहे. तर डेप्थ सेंसरसाठी 2MP चा वापर केला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 16MP चा कॅमेरा सेटअप मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे.
Micromax In 1b या स्मार्टफोनसाठी सुद्धा दोन वेरियंट दिले आहेत. त्यामध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 7999 रुपये असणार आहे. तर 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 6999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. मायक्रोमॅक्स एन 1बी स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या बेवसाइटच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनचा सेल येत्या 26 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.(Realme C15 Qualcomm Edition भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स)
मायक्रोमॅक्स इन नोट1 मध्ये 6.67 इंचाचा पंच होल एचडीप्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. फोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड स्टॉक वर्जन ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमच्या रियर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असणार आहे. तर 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा सपोर्ट मिळणार आहे. त्याचसोबत 2MP मॅक्रो लेन्स दिली गेली आहे. तर डेप्थ सेंसर म्हणून 2MP चा वापर केला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट पॅनलवर 16MP चा कॅमेरा सेंसर मिळणार आहे. पॉवर बॅकबद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.