Vivo V20 SE (Photo Credits-Twitter)

ग्लोबल स्मार्टफोन ब्रॅन्ड Vivo ने भारतात Vivo V20 SE स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसाठी 8GB रॅम आणि 128GB सिंगल स्टोरेज वेरियंटमध्ये उतरवला आहे. याची किंमत 20,990 रुपये आहे. Vivo V20 SE स्मार्टफोन दोन रंगाच्या ऑप्शन Gravity Black आणि Aquamarine Green मध्ये खरेदी करता येणार आहे. नव्या Vivo V20 SE हा उद्यापासून (3 नोव्हेंबर) पासून सर्व मेनलाइन रिटेल पार्टनर्ससह विवो इंडियाच्या ई-स्टोअर आणि प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. फोन 3D कर्व्ड डिझाइन मध्ये येणार आहे. फोनमध्ये सिक्युरिटी फिचर्सअंतर्गत फिंगरप्रिंट स्कॅनरचे सपोर्ट मिळणार आ हे. Vivo V20 SE अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित Funtouch OS 11 वर काम करणार आहे. फोनमध्ये प्रोसेसरच्या आधारावर Qualcomm Snapdragon 665 चा वापर केला गेला आहे. फोनमधील स्पेस मेमोरी कार्डच्या मदतीने टीबी पर्यंत वाढवता येणार आहे. फोनच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यालस Vivo V20 SE स्मार्टफोन 7.83mm थिकनेस आणि 171 ग्रॅम वजनसह येणार आहे. फोन शानदार फिनिशिंगसह पॉलिमर मॅटेरेरियरसह येणार आहे. फोनमध्ये 90.12 टक्के स्क्रिन टू बॉडी रेश्यो दिला आहे.(Yahoo Mobile ने लॉन्च केला पहिला स्मार्टफोन ZTE Blade A3Y, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

Vivo V20 SE स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा 48MP AI लैससह येणार आहे. याचे अपर्चर f/1.8 असणार आहे. तर सेंकेडरी कॅमेऱ्यासाठी 8MP चा वाइड अँगल लेन्सचा सपोर्ट मिळणार आहे. ज्याचे अपर्चर f/2.2 असणार आहे. 8MP चा सुपर वाइड-अँगल कॅमेरा , 120 डिग्री पॅनरॉमिक व्यू मिळणार आहे. तसेच फोनच्या फ्रंटला पॅनलवर 32MP लेन्स दिली गेली आहे. V20 SE मध्ये 4100mAh बॅटरी दिली गेली आहे. जी 33W फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानासह येणार आहे. याचा वापर करुन 30 मिनिटात स्मार्टफोन शून्य ते 62 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.