Realme C15 Qualcomm Edition भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स
Realme C15 Qualcomm Edition (PC - Twitter)

Realme C15 Qualcomm Edition: रियलमीने आज भारतात अत्यंत लोकप्रिय सी सीरिजमधील Realme C15 Qualcomm Edition लाँच केली आहे. ही रियलमीची C15 ची सर्वात खास आणि अधिक पावरफूल आवृत्ती आहे. Realme C15 या स्पेशल एडिशनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आहे. त्यामुळे याला क्वालकॉम एडिशन म्हणतात. Realme C15 क्वालकॉम एडिशन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेले व्हेरिएंट 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचे व्हेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केले आहेत. या मोबाइलची विक्री फ्लिपकार्ट, realme.com आणि किरकोळ स्टोअरवर 29 ऑक्टोबरपासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. त्याच बरोबर, सणासुदीच्या काळात, रियलमी हा फोन खरेदीवर मर्यादित काळासाठी 500 रुपयांची सूट देत आहे. Realme C15 चे हे नवीन व्हेरिएंट सर्वात स्वस्त आणि अधिक शक्तिशाली प्रोसेसरसह आहे. (हेही वाचा - Twitter Down: मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर झालं डाऊन; यूजर्संनी नोंदवल्या तक्रारी)

दरम्यान, Realme C15 क्वालकॉम एडिशनमध्ये 6000 एमएएच बॅटरी आहे. कंपनीने अगदी कमी किंमतीत स्वस्त फोन आणला आहे. जो अधिक पावरफूल आणि अधिक बॅटरी बॅकअपसह आहे. सणासुदीच्या हंगामात सी सीरिजच्या स्मार्टफोनला प्रचंड मागणी असताना कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. (वाचा - LG Wing आणि LG Velvet Dual Screen स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या या धमाकेदार फोन्सचे फिचर्स आणि किंमत)

Realme C15 क्वालकॉम एडिशन 6.5 इंचाचा एचडी + मिनी ड्रॉप स्क्रीन असणारा हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित असून यात 4 रियर कॅमेरे आहेत. क्वाड कॅमेरा मधील प्राथमिक कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आणि दुय्यम अल्ट्रा वाइड फिचर्ससह आहे. तिसरा कॅमेरा 2 एमपीचा आहे. जो ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट लेन्सचा असून चौथा कॅमेरा 2 एमपी रेट्रो लेन्सचा आहे. या व्यतिरिक्त या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.