Twitter Down: मायक्रोब्लॉगिंग साईट (Microblogging Platform) ट्विटर बुधवारी संध्याकाळी डाऊन झालं. त्यामुळे यूजर्संमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या समस्येमुळे यूजर्संना ट्विट करण्यात अडथळा येत आहे. ट्विट करताना यूजर्संना "Try Again" आणि "Something Went Wrong" असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांची टाइमलाइन रीफ्रेश करण्यास सक्षम नसल्याची तक्रार केली. भारतासह मलेशिया, इंडोनेशिया या देशांमधील युजर्संनीदेखील ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यामुळे अनेक यूजर्संना त्रास सहन करावा लागला आहे. आज रात्री 8:20 मिनिटांनी ही समस्या उद्भवली.
रिफ्रेश करूनही ट्विटरवरील माहिती अपडेट होत नसल्याच्या तक्रारी यूजर्संनी केल्या आहेत. ट्विटर डाऊन होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. हजारो यूजर्संनी downtracker.com. वर आपली तक्रार नोंदवली आहे. (हेही वाचा - आरोग्य सेतू अॅप NIC आणि आयटी मंत्रालयाद्वारे विकसित; RTI च्या नोटीसनंतर केंद्राचे स्पष्टीकरण)
विशेष म्हणजे ट्विटरकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान करण्याता आलेले नाही. या महिन्याच्या सुरूवातीलाही ट्विटरवर अशीचं समस्या उद्भवली होती. या महिनाभरात ट्विटर तिसऱ्यांदा डाउन झालं आहे. त्यामुळे ट्विटर यूजर्संना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी आउटेजबद्दल माहिती देण्यासाठी फेसबुक सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. डाऊन डिटेक्टर लाइव्ह आऊटेज नकाशानुसार, ट्विटर सध्या भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि जगातील इतर काही भागात डाऊन झालं आहे.