Mi Watch Lite स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Watch (Photo Credits-Twitter)

Mi Watch Light स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आले आहे. हे वॉच शाओमीच्या ग्लोबल साइटवर लिस्ट केले आहे. मात्र स्मार्टवॉचच्या किंमतीसह उपलब्धतेबद्दल अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र अशी अपेक्षा केली जात आहे की, नवे स्मार्टवॉच Redmi Watch च्या किंमतीतच उपलब्ध करुन दिले जाऊ शकते. Redmi Watch ची किंमत चीनमध्ये CNY 299 (जवळजवळ 3300 रुपये) आहे. एमआय वॉच लाइट हे Pink, Ivory, Olive, Navy Blue कलर ऑप्शनमध्ये ब्लॅक स्ट्रॅप ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.

Mi Watch Lite मध्ये 1.4 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 320x320 पिक्सल असणार आहे. स्मार्टवॉच स्केअर LED डिस्प्ले मध्ये येणार असून पिक्सल डेन्सिटी 323ppi असणार आहे. तर ब्राइटनेस 350nits असणार आहे. पॉवरबॅकअपसाठी स्मार्टवॉचमध्ये 230 mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. ती चार्ज होण्यासाठी दोन तास लागणार आहे. सिंगल चार्जमध्ये स्मार्टवॉच 9 दिवसापर्यंत वापरता येणार आहे. Mi वॉच लाइटमध्ये 11 स्पोर्ट्स मोड्स मिळणार आहेत. यामध्ये आउटडोर सायकलिंग, इनडोर सायकलिंग, आउटडोर रनिंग, ट्रेडमिल, वॉकिंग सारखे फिचर्स मिळणार आहेत.(boAt Watch Enigma भारतात लॉन्च, 10 दिवसांच्या बॅटरीलाइफसह युजर्सला मिळणार 'हे' दमदार फिचर्स)

Mi वॉच लाइट 5ATM वॉटर रेजिस्टेंससह येणार आहे. जी 50 मीटर खोल पाण्यात खराब सुद्धा होणार नाही. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लिप मॉनिटरिंग आणि गायडेंट ब्रीदिंग एक्सरसाइजचा समावेश आहे. यामध्ये चॅट, कॉल नोटिफिकेशन ही मिळणार आहेत. त्याचसोबत स्मार्टवॉचमध्ये 120 हून अधिक फेस ऑप्शन दिले जाणार आहेत. याचे वजन 35 ग्रॅम असणार आहे. अॅन्ड्रॉइड युजरला Xiaomi Wear अॅपच्या मदतीने कनेक्ट करण्यासाठी इंस्टॉल करावे लागणार आहे. तर iOS युजर्सला Xiaomi Wear Lite अॅप इंस्टॉल करावा लागणार आहे.