boAt Watch Enigma (Photo Credits-Twitter)

BoAt India ने त्यांचे नवे स्मार्टवॉच boAt Watch Enigma भारतात लॉन्च केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये SpO2 सेंसर दिले आहे. जे रक्तातील ऑक्सिजनची क्षमता मोजण्यासह हार्ट रेट आणि स्लिप ट्रॅक करते. या व्यतिरिक्त वॉचमध्ये कॉल, मेसेज नोटिफिकेशन फिचर्स ते अलार्म पर्यंतचे अन्य फिचर्स मिळणार आहेत. boAt Watch Enigma च्या किंमती आणि स्पेसिफिकेशनबद्दल येथे अधिक जाणून घ्या.(भारतात प्रथमच लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँक लॉन्च, जाणून घ्या खासियत)

boAt Watch Enigma ची किंमत 2999 रुपये आहे. हे स्मार्टवॉच ग्राहकांसाठी फक्त ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि शॉपिंग वेबसाईट Amazon India च्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.54 इंचाचा कलर डिस्प्ले दिला आहे. जो नेहमच ऑन डिस्प्ले फिचर लेस आहे. या वॉचमध्ये 12 हून अधिक वॉच फेससह कनेक्टिव्हिटीसाठी ब्लुटूथ 4.2 दिले आहे. त्याचसोबत वॉचमध्ये युजर्सला Meditation फिचर ही मिळणार आहे.

कंपनीने boAt Watch Enigma स्मार्टवॉचमध्ये Find My Phone फिचर दिले आहे. ज्याच्या माध्यमातून फोन शोधता येणार आहे. या वॉचमध्ये 8 स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. त्यामध्ये रनिंग, वॉकिंग आणि क्लाइबिंग सारखे फिचर्सचा समावेश आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉचमध्ये 230mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी डेली युजेसमध्ये 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणार आहे. पॉवर सेविंग मोडमध्ये 30 दिवसांचा बॅटरी बॅकअप दिला जाणार आहे.(Redmi Watch लॉन्च, युजर्सला मिळणार 12 दिवसांचा बॅटरी बॅकअपसह 'हे' फिचर्स)

boAt Watch Enigma पूर्वी Boat Strom स्मार्टवॉच ऑक्टोंबर महिन्यात लॉन्च केला होता. या स्मार्टवॉचची किंमत 5990 रुपये आहे. यामधअये 1.3 इंचाचा टच कर्व्ड डिस्प्ले दिला गेला आहे. या वॉचमध्ये SPO2 सेंसर दिला आहे. त्याचसोबत 24 तास हार्ट रेट मॉनिटर करणारे सेंसर ही दिले गेले आहे.