TCS

करोनाच्या काळात अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम दिले होते. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमसाठी विविध सोयी सुविधा देखील कंपनी कडून देण्यात आल्या. मात्र करोनाच्यानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपल्याला कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यासाठी बोलावण्यात आले. TCS ही अशीच एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगत आहे. तथापि, टीसीएसचे एचआर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात अनेक महिला कर्मचाऱ्यांनी अशाच कारणासाठी राजीनामा देत असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे कंपनीला अनेक समस्येचा सामना करावा लागत असल्याचे कंपनी सांगितले.  (हेही वाचा - MRF Share Price Record: 'बिग बूल' एमआरएफ समभागाची गगनभरारी, भारताच्या इतिहासात प्रथमच गाठली गेली प्रति Stock एक लाख रुपये किंमत)

लक्कड यांनी ठामपणे सांगितले की कंपनीने लोकांना कार्यालयात परत येण्यास सांगितले आणि महिला कर्मचार्‍यांकडून अधिक राजीनामे आले आहेत कारण त्यांना घरून काम करायचे आहे. हे एक कारण असू शकते आणि भेदभावाचा संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. TCS ने मागील आर्थिक वर्षात 20 टक्क्यांहून अधिक कर्मचारी गमावले. या टक्केवारीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचा समावेश आहे. वर्क फॉर्म ऑफिस या पॉलिसीमुळे किती महिला कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली असल्याचे कंपनीने सांगितले नाही.

टीसीएसमध्ये महिलांची संख्या ही पुरषांच्या संख्ये पेक्षा ही कमी आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण अन्य ही असू शकतात असे देखील सांगण्यात आले. मला असे वाटते की साथीच्या काळात घरून काम करणे काही महिलांसाठी घरगुती व्यवस्था रीसेट करते, त्यांना परत येण्यापासून रोखते. सर्वकाही सामान्य झाल्यानंतरही कार्यालयात जा, ” असे मिलिंद लक्कड यांनी सांगितले.

त्यांनी हे देखील उघड केले की सर्वांच्या समावेशाला प्रोत्साहन देण्याचे TCS चे उद्दिष्ट कमी होणार नाही आणि ते स्त्री आणि पुरषांना कामावर घेणे हे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये आता 6,00,000 पेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे, त्यापैकी 35 टक्के महिला कर्मचारी आहेत. या व्यतिरिक्त, अहवालात दावा करण्यात आला आहे की TCS मध्ये तीन चतुर्थांश महिला कंपनीच्या उच्च पदांवर आहेत.