MRF Share Price | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

MRF Share Price: भारतीय शेअर बाजारात बिग बूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआरएफ कंपनीच्या समभागाने (MRF Stock) आज (June 13) इिताहासातील उच्चांक (MRF Share Price Record) नोंदवला. प्रति शेअर एक लाख रुपयाला स्पर्श करणारा MRF हा पहिला भारतीय शेअर ठरला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (Bombay Stock Exchange) बाजार बंद झाला तेव्हा काल 98,939.70 झालेला MRF समभाग आज ₹99,500 वर उघडला. बाजाराच्या सकाळच्या प्रहरात या समभागाने 1,00,300 रुपये इतक्या किमतीला स्पर्श (MRF Became the First Indian Stock to Touch the Rupee One Lakh) केला. जी एमआरएफच्या भांडवली बाजारातील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.

एमआरएफ समभागाच्या किमतीत गेल्या वर्षभरात या समभागात जोरदार वाढ झाली आहे. बेंचमार्क सेन्सेक्समधील 19 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत गेल्या एका वर्षात स्टॉक 45 टक्क्यांनी वाढला आहे. MRF समभागांनी 17 जून 2022 रोजी BSE वर ₹65,900.05 ची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली. मागील सत्राच्या समाप्तीपर्यंत, स्टॉक त्या पातळीपासून 50 टक्क्यांनी वधारला आहे.

उल्लेखनीय असे की, MRF चा निव्वळ नफा 86 टक्क्यांनी वाढून 313.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 168.5 कोटी होता. कोर ऑपरेशन्समधून त्याचा एकत्रित महसूल देखील या तिमाहीत 10 टक्क्यांनी वाढून 5,842 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या 5,305 कोटी रुपयांच्या तुलनेत होता. (हेही वाचा, Indian Stocks Markets Bloodbath: जागतिक अर्थकारणाचा फटका, भारतीय शेअर बाजार धक्क्याला, सेन्सेक्स 1250 अंकांनी आपटला, निफ्टीची 17,200 वर दमछाक)

ट्विट

मार्च 2023 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा करानंतरचा एकत्रित नफा (PAT) ₹313.53 कोटी होता. जो त्याच तिमाहीत प्राप्त झालेल्या ₹168.53 कोटीच्या निव्वळ नफ्यातून वार्षिक (YoY) 86 टक्क्यांनी वाढला आहे. FY22 चा. त्याचा FY23 च्या चौथ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल ₹5,841.7 कोटी होता, जो FY22 च्या चौथ्या तिमाहीत ₹5,304.8 कोटी वरून 10.12 टक्क्यांनी वाढला आहे. Q4FY23 मध्ये कंपनीचा निव्वळ खर्च ₹5,410.26 Cr होता जो Q4FY22 मध्ये ₹5,142.79 Cr होता. समीक्षाधीन तिमाहीत MRF चा EPS ₹803.26 वर पोहोचला आहे, ज्याच्या तुलनेत मागील वर्षीच्या तिमाहीत ₹389.55 नोंदवले गेले होते. अभ्यासक सांगतात की, MRF ची मूलभूत तत्त्वे आकर्षक दिसतात. मात्र एखाद्याने हा समभाग दीर्घ मुदतीसाठी विकत घेतला तरच तो परवडणारा ठरलेल. तथाफी अनेक लोक या समभागाकडे अत्यल्प काळात तगडा मोबदला देणारा स्टॉक म्हणूनही पाहतात