Lava Z2 Max (Photo Credits: Twitter)

लावा (Lava) कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Lava Z2 Max लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे 8000 रुपये किंमतीच्या आत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. यात मिडियाटेक प्रोसेसर आणि 4G LTE सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर अॅनड्रॉईड 10 (Android 10) मिळत आहेत.

Lava Z2 Max स्मार्टफोन 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतो. याची किंमत 7,799 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, पेमेंट करतेवेळी आता द्यावा लागणार नाही 'हा' शुल्क

Lava Z2 Max मध्ये 7 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. जी 258ppi पिक्सेल डेन्सिटी आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येते. या स्मार्टफोनचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये Wi-Fi, 4G VoLTE, Bluetooth v5, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान मार्च महिन्यात भारतीय मोबाईल कंपनी लावा (Lava) ने आपल्या ग्राहकांसाठी खास 3 स्वस्त टॅबलेट्स लाँच केले आहेत. Lava Magnum XL, Lava Aura आणि Lava Ivory हे या टॅबलेट्सची नावे आहेत. नुकतेच हे टॅबलेट्स भारतात लाँच करण्यात आली असून यात ग्राहकांना जबरदस्त फिचर्स अनुभवता येणार आहे. 9,000 ते 15,000 रुपयांच्या किंमतीत येणा-या या टॅबलेट्समध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हे टॅबलेट्स ई कॉमर्स साइट Flipkart वर सेलसाठी उपलब्ध केले आहेत.लावा कंपनीचे हे टॅबलेट्स या रेंजमधील अन्य ब्रँडच्या टॅबलेट्सला तगडी टक्कर देणार आहेत.