Paytm (Photo Credits: ANI)

जर तुम्ही सुद्धा पेटीएमचा (Paytm) वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण देशभरात कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांना कंपनीकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. कंपनीने असे म्हटले की, कोरोना संदर्भातील सर्व कर्जावर आता कोणतीही ट्रांजेक्शन फी लावण्यात येणार नाही आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, देशातील सर्व रजिस्टर्ड एनजीओच्या देवाणघेवाणीवर 0 टक्के शुल्क द्यावा लागणार आहे. ही सुविधा पेमेंट गेटवे (Paytm Payment Gateway) सर्विसवर उपलब्ध करुन दिली जात आहे.

कंपनीने असे म्हटले आहे की, या सुविधेच्या कारणामुळे पेमेंट करणे सोपे होणार आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या काळात कोणत्याही समस्येशिवाय काम होत राहणार आहे. पुढे असे सांगण्यात आले आहे की, संपूर्ण देशात रजिस्टर्ड एनजीओला आपल्या पेमेंटसाठी गेटवे सर्विस दिली जाते. जी कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. गेल्या काही आठवड्यांत पेटीएम पेमेंट गेटवेच्या एनजीओच्या दानमध्ये 400 टक्क्यांची वाढ झाली आहे. हेच पाहता कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

Tweet:

दरम्यान, जर तुम्ही सु्द्धा या मॅपच्या आधारे पाणी, विजेचे बिल किंवा मोबाईल रिचार्जचे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करता तर ते गेटवेच्या माध्यमातून केले जाते. या व्यतिरिक्त कार्ड डिटेल्स देत गेटवेचा वापर केला जाऊ शकतो. याच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया सोप्पी होते. तसेच पेमेंट करण्यासाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स पेमेंट गेटवेच्या कन्फर्मेशनसाठी पाठवले जातात.