Lava कंपनीने भारतात लाँच केले 3 स्वस्त टॅबलेट्स, किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
Lava Tablets (Photo Credits: Twitter/Lava Mobiles)

भारतीय मोबाईल कंपनी लावा (Lava) ने आपल्या ग्राहकांसाठी खास 3 स्वस्त टॅबलेट्स लाँच केले आहेत. Lava Magnum XL, Lava Aura आणि Lava Ivory हे या टॅबलेट्सची नावे आहेत. नुकतेच हे टॅबलेट्स भारतात लाँच करण्यात आली असून यात ग्राहकांना जबरदस्त फिचर्स अनुभवता येणार आहे. 9,000 ते 15,000 रुपयांच्या किंमतीत येणा-या या टॅबलेट्समध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हे टॅबलेट्स ई कॉमर्स साइट Flipkart वर सेलसाठी उपलब्ध केले आहेत.लावा कंपनीचे हे टॅबलेट्स या रेंजमधील अन्य ब्रँडच्या टॅबलेट्सला तगडी टक्कर देणार आहेत.

विद्यार्थी आणि ऑनलाईन क्लासेस घेणा-यांसाठी या टॅबलेट्सचा फार चांगला उपयोग होईल. यात E-Books सुद्धा डाउनलोड केले जाऊ शकते. लावाच्या या टॅबलेट्समध्ये EduSaksham मोफत ऑनलाईन क्लासेस सब्सक्रिप्शन मिळेल.हेदेखील वाचा- मोबाईल उत्पादन करणारी 'लावा' कंपनी भारतात पुढील 5 वर्षात 800 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार

Lava Magnum XL च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 10.1 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. यात 60Hz रिफ्रेश रेट IPS LCD डिस्प्ले मिळतो, जो 360 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात 2MP चा फ्रंट कॅमेरा आणि 5MP चा रियर कॅमेरा मिळतो. हा टॅबलेट 32GB चे अंतर्गत स्टोरेज देतो. यात 6100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Lava Magnum XL ची किंमत 15,499 रुपये आहे. ऑफरमुळे तुम्हाला हा 11,999 रुपयात खरेदी करता येईल.

Lava Aura विषयी सांगायचे झाले तर, यात 8 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. यात 5100mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यात 8MP चा रियर आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 32GB ची अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो. याची किंमत 12,999 रुपये आहे. जो सध्या 9,999 रुपयात उपलब्ध आहे.

Lava Ivory टॅबलेटमध्ये 7 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. याची किंमत 7,399 रुपये इतकी आहे. याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो. यात 5MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.