जिओ कंपनीकडून त्यांचा नवा स्मार्टफोन JioPhone Next कधी लॉन्च होणार याबद्दल चर्चा सुरु आहे. अशातच हा स्मार्टफोन दिवाळीच्या दिवशी लॉन्च केला जाणार आहे. म्हणजेच सणासुदीच्या काळात एखाद्याला भेट देण्यासाठी हा स्मार्टफोन खिशाला परवडणारा ठरणार आहे. एका रिपोर्टनुसार जिओ नेक्स्ड फोन 4 नोव्हेंबरला कंपनी तो लॉन्च करु शकते.
कंपनीने यंदाच्या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या आपल्या 44व्या AGM मध्ये आपला नवा स्मार्टफोन JioPhone Next झळकवला होता. हा स्मार्टफोन Jio ने गुगलसह मिळून तयार केला आहे. त्याचसोबत याची खासियत अशी की, कमी किंमतीमधील जिओचा हा 4G स्मार्टफोन असणार आहे. यापूर्वी स्मार्टफोन 10 डिसेंबरला लॉन्च केला जाणार होता. परंतु काही कारणांमुळे कंपनीने तो लॉन्च केला नाही. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनची किंमत 5 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.(Google Meet ला मिळाले नवे अपडेट, आता मिटिंग होस्टला करता येणार 'हे' बदल)
JioPhone Next संदर्भात कंपनीने स्पष्ट केले आहे की, हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइडच्या कस्टमाइज वर्जनवर आधारित असणार आहे. यामध्ये Automatic Readaloud Of Screen Text, ट्रान्सलेशन, गुगल असिस्टंट, स्मार्ट कॅमेरा आणि आर्ग्युमेंटेट रियलिटी सारखे खास फिचर्स सुद्धा मिळणार आहेत. जिओ कंपनीचा स्मार्टफोन असल्याने युजर्सला JioTv, MyJio, Jio Saavn सारखे अॅप प्री-लोडेड मिळणार आहेत. असे ही म्हटले जात आहे की, या स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 215 वर उतरवला जाऊ शकतो. यामध्ये 3GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. फोनमध्ये 13MP चा सिंगल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.