Reliance Jio भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. जिओकडे सध्या विविध वैधता आणि किंमतीचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हायस्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन युजर्सला दिले जाते. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला जिओच्या बेस्ट सेलिंग प्रीपेड प्लॅनबद्दल अधिक माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटासह अन्य बेनिफिट्स सुद्धा मिळणार आहेत. तर जाणून घ्या जिओच्या या प्रीपेड प्लॅन्सबद्दल अधिक माहिती.(Tecno Spark 7P भारतात लाँच, स्मार्टफोनमध्ये आहेत 'ही' खास वैशिष्ट्ये)
रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅन्सला खासकरुन एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलला टक्कर देण्यासाठी उतरवण्यात आले आहे. हे रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडीटीसह येणार आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला प्रतिदिन 2GB डेटा आणि 100SMS फ्री मिळणार आहेत. त्याचसोबत युजर्सला अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा करता येणार आहे. या व्यतिरिक्त सर्व युजर्सला जिओ क्लाउड, जिओ टीव्ही आणि जिओ न्यूज सारखे प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहेत.(Instagram Reels व्हिडिओ मोबाईलमध्ये कसे Save कराल? जाणून घ्या सोप्पी ट्रिक)
दरम्यान, जिओ कंपनीने नुकत्याच itel सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता अशी माहिती समोर आली आहे की, दोन्ही कंपन्या मिळून स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, हा फोन अशा लोकांसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे ज्यांना फिचर्स मधून स्मार्टफोनवर शिफ्ट व्हायचे आहे. या डिवाइसची किंमत 7 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र रिपोर्ट्समधून डिवाइसच्या स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही.