Instagram Reels व्हिडिओ मोबाईलमध्ये कसे Save कराल? जाणून घ्या सोप्पी ट्रिक
Instagram (Photo Credits-File Image)

टिकटॉकवर (TikTok) सरकारकडून बंदी घातल्यानंतर आता Instagram कडून Reels फिचर्स रोलआउट करण्यात आले. सध्या हे फिचर्स टिकटॉक प्रमाणेच काम करत असून युजर्सकडून ही याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लाखो युजर्स या फिचरच्या माध्यमातून आपले शॉर्ट व्हिडिओ तयार करुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. दुसऱ्या बाजूला रिल्स व्हिडिओ सुद्धा प्रचंड पाहिले जातात. अशातच काही रिल्स तुम्हाला आवडतात पण ते सेव्ह करु शकत नसल्याने पंचायत होते. याच संदर्भातील आम्ही सोप्पी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही इंन्स्टाग्रामवरील रिल्स व्हिडिओ डाऊनलोड करु शकतात.

इंन्स्टाग्रामवरील रिल्स डाऊनलोड करण्यासाठी मात्र तुम्हाला काही सोप्प्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागणार आहेत. फक्त लक्षात असू द्या त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टीचा आधार घ्यावा लागणार आहे.(Facebook घेऊन येत आहे Dating App , फक्त 4 मिनिटांत मिळेल इच्छित जीवनसाथी ! जाणून घ्या कसे असेल अ‍ॅप)

Android युजर्स 'या' पद्धतीने डाऊनलोड करा रिल्स

-सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Video Downloader for Instagram अॅप डाऊनलोड करा.

-अॅप सुरु केल्यानंतर आयडी सेटअप करा

-इंन्स्टाग्राम अॅपमध्ये जाऊन जी रिल्स निवडा ती तुम्हाला डाऊनलोड करायची आहे.

-असे केल्यानंतर तीन डॉट आयकॉन वर टॅप करुन लिंक कॉपी करा

-व्हिडिओ डाऊनलोडर फॉर इंन्स्टाग्राम अॅप सुरु करुन कॉपी केलेली URL आपोआप पेस्ट होईल.

-आता फोन गॅलरीत गेलात तेथे तुम्हाला Reels डाऊनलोड झालेले दिसून येईल.

iPhone युजर्स 'या' पद्धतीने डाऊनलोड करा रिल्स

-सर्वात प्रथम अॅप स्टोअरवर जाऊन InSaver for Instagram अॅप डाऊनलोड करा.

-अॅप सुरु केल्यानंतर आयडी सेटअप करा

-इंन्स्टाग्राम अॅपमध्ये जाऊन रिल्स निवडा जी तुम्हाला डाऊनलोड करायची आहे.

-असे केल्यानंतर तीन डॉट आयकॉनवर टॅप करुन लिंक कॉपी करा.

-InSaver for Instagram अॅप सुरु करुन तुम्ही कॉपी केलेली URL आपोआप पेस्ट होईल.

-आता फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन तेथे तुम्हाला रिल्स डाऊनलोड झालेले दिसून येईल.

तर वरील काही सोप्प्या ट्रिक्स वापरुन तुम्ही इंन्स्टाग्रामवरील रिल्स डाऊनलोड करु शकता. तसेच इंन्स्टाग्रामवर सध्या विविध फिचर्सचा वापर करुन ही तुमचे अकाउंटचा आलेख उंचावू शकता.