होळीनिमित्त Jio चे दोन खास प्लॉन लाँच; दररोज 2.5GB पर्यंत डेटासह मिळणार 'ही' सुविधा, वर्षभराच्या रिचार्जला मिळणार सुट्टी
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना भेटवस्तू देत दोन नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने वर्क फ्रॉम होम श्रेणी (Work From Home Data Packs) या दोन्ही योजना सादर केल्या आहेत. त्यांची किंमत 2,878 रुपये आणि 2,998 रुपये आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 2 GB आणि 2.5 GB डेटा मिळणार आहे. दोन्ही योजना कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. चला तर या प्लानविषयी जाणून घेऊयात.

Jio चा 2,878 रुपयांचा WFH प्लॅन -

रिलायन्स जिओचा 2878 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 730GB GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत घसरेल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत. (हेही वाचा - Netflix ने दिला मोठा झटका! वापरकर्ते करू शकणार नाहीत 'हे' काम; खिशावरही होणार परिणाम)

Jio चा 2,998 रुपयांचा WFH प्लॅन -

जिओच्या नवीन 2998 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, वापरकर्त्यांना 365 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण 912.5GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत घसरेल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.

जिओचे इतर वर्क फ्रॉम होम प्लॅन -

कंपनीकडे रु. 181, रु. 241 आणि रु. 301 चे आणखी 3 वर्क फ्रॉम होम प्लॅन आहेत. हे तिन्ही प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 जीबी, 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी डेटा दिला जातो.