Netflix ने दिला मोठा झटका! वापरकर्ते करू शकणार नाहीत 'हे' काम; खिशावरही होणार परिणाम
Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नेटफ्लिक्स (Netflix) आता खाते एक वापरकर्ते अनेक या फंड्यावर ब्रेक लावणार आहे. जगभरात असे अनेक वापरकर्ते आहेत जे Netflix चे सदस्यत्व घेतात आणि त्यांच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह पासवर्ड शेअर करतात, जेणेकरून प्रत्येकजण Netflix चा आनंद घेऊ शकेल. वापरकर्त्यांसाठी हा एक फायदेशीर करार आहे. परंतु, कंपनीला याचा खूप त्रास होत आहे. हे लक्षात घेऊन नेटफ्लिक्स आता पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा विचार करत आहे.

पासवर्ड शेअरिंग टाळण्यासाठी कंपनी काही चाचण्याही करत आहे. त्यामुळे आता वापरकर्त्यांना पासवर्ड शेअर करण्यासाठी कंपनीला पैसे द्यावे लागतील. कंपनी एका घरात (एका ठिकाणी) राहणाऱ्या वापरकर्त्यांना पासवर्ड शेअर करण्याचा पर्याय देईल. त्याचवेळी, वापरकर्त्यांना घराबाहेर इतर ठिकाणी प्राथमिक खात्याच्या लॉगिन तपशीलावरून नेटफ्लिक्स चालवण्यासाठी पैसे द्यावे लागतील. (हेही वाचा - Shocking! देशातील तरुणाई Internet च्या आहारी; दिवसातील 8 तास Online खर्च करते)

गेल्या वर्षभरापासून फिचरची चाचणी सुरू -

गेल्या वर्षीही कंपनी या फीचरची चाचणी करत होती. या दरम्यान, वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर याशी संबंधित एक संदेश देखील प्रदर्शित झाला. या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, जर तुम्ही अकाऊंटच्या मालकासोबत राहत नसाल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे नेटफ्लिक्स अकाउंट बनवावे लागेल. नवीन बदलांसह आपला व्यवसाय नफा वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे जेणेकरून नवीन मालिका आणि चित्रपटांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे गुंतवणूक करता येईल.

कंपनीचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगई लाँग यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की, "आम्ही समजतो की वापरकर्त्यांकडे मनोरंजनासाठी अनेक पर्याय आहेत. त्यामुळेच नेटफ्लिक्समध्ये येणारे कोणतेही नवीन फीचर युजर्ससाठी सोयीचे आणि उपयुक्त असावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच, आम्ही आमच्या मोठ्या टीव्ही शो आणि चित्रपटांना सबस्क्रिप्शनच्या पैशातून निधी देतो हे निर्विवाद आहे. कंपनीने सांगितले की, ते असे मार्ग शोधत आहे ज्याच्या मदतीने एकापेक्षा जास्त वापरकर्ते थोडे अतिरिक्त पैसे देऊन एक खाते वापरू शकतात.

दरमहा द्यावे लागणार 2 ते 3 डॉलर्स -

पासवर्ड शेअरिंगला ब्रेक लावणाऱ्या फिचर्सची चाचणी चिली, कोस्टा रिका आणि पेरूमध्ये चाचणी केली जात आहे. येत्या आठवड्यात, या देशांतील वापरकर्त्यांना उप-खात्यामध्ये दोन अतिरिक्त वापरकर्ते जोडण्याची सुविधा मिळेल. यासाठी कंपनी दर महिन्याला 2 ते 3 डॉलर आकारणार आहे. कंपनी आपल्या मानक आणि प्रीमियम योजनांसाठी नवीन फिचर्स आणणार आहे.