Jio Phone Prepaid Data Vouchers: खुशखबर! जिओने लाँच केले 22 रुपयांपासून 152 रुपयांचे 5 जिओ फोन प्रीपेड डेटा व्हाउचर; 56GB पर्यंत मिळेल डेटा, जाणून घ्या खास ऑफर्स
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

Jio Phone Prepaid Data Vouchers: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने पाच नवीन डेटा व्हाउचर लाँच केले आहेत. या डेटा व्हाउचरची किंमत 22 रुपयांपासून सुरू होत असून यात 56 जीबी पर्यंत डेटा उपलब्ध आहे. हे डेटा व्हाउचर केवळ जिओफोन वापरकर्त्यांसाठी आहेत. या डेटा व्हाउचरची किंमत 22 रुपये, 52 रुपये, 72 रुपये, 102 रुपये आणि 152 रुपये आहे. या व्हाउचरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात...

जिओफोन डेटा व्हाउचर्सची किंमत 22 रुपये पासून सुरू होते आणि या सर्वांची वैधता 28 दिवस आहे. या व्हाउचर्समध्ये डेटा व्यतिरिक्त कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा उपलब्ध नाही. म्हणजेच, जर आपल्याकडे कमी डेटा असेल तर, तुम्ही या डेटा व्हाउचरचा वापर करू शकता. 22 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा मिळतो. (वाचा - खुशखबर! Reliance कडून 'Jio Phone 2021' ऑफरची घोषणा, 1,499 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार वर्षभराचा डेटा प्लान आणि बरेच काही)

याशिवाय 52 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये 6 जीबी डेटा देण्यात येत आहे. या पॅकची वैधता देखील 28 दिवस आहे. या व्यतिरिक्त, 72 रुपयांच्या पॅकमध्ये 28 दिवसांसाठी 14 जीबी डेटा देण्यात येत आहे. तसेच 102 रुपयांच्या पॅकमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा (एकूण 28 जीबी) आणि 152 रुपयांच्या पॅकमध्ये 28 दिवसांसाठी रोज 2GB डेटा (एकूण 56 जीबी) दिला जात आहे.

दरम्यान, कंपनीने अलीकडेचं जिओ फोन वापरकर्त्यांसाठी 749 रुपयांचा नवीन All-In-One-Plan आणला आहे. ही योजना 336 दिवसांच्या वैधतेसह येते. यामध्ये 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे या व्हाउचरमध्ये एकूण 24 जीबी डेटा देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सर्व नेटवर्कवर दरमहा अमर्यादित कॉलिंग व 50 एसएमएस दिले जात आहेत.