खुशखबर! Reliance कडून 'Jio Phone 2021' ऑफरची घोषणा, 1,499 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार वर्षभराचा डेटा प्लान आणि बरेच काही
Reliance Jio (Photo Credit-Wikimedia Commons)

रिलायन्स जिओकडून (Reliance Jio) यावर्षीची खास ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. 'Jio Phone 2021' असे या ऑफरचे नाव असून यात 1499 रुपयांचे वर्षभराचा रिचार्ज प्लान आणला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्स (Unlimited Calls), डेटा प्लान (Data Plan) आणि मोफत जिओचा फोनही (Free Jio Phone) मिळणार आहे. यामुळे ही विशेष ऑफर आणण्यात आली आहे. यामध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात हाय स्पीड डेटाही देण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभर तुम्हाला रिलायन्स जिओच्या

रिलायन्स जिओच्या या 1499 रुपयांच्या प्लानमध्ये एक वर्षासाठी ग्राहकाला अनलिमिटेड सर्विसेस ऑफर केल्या जात आहेत. यात वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल्स आणि प्रत्येक महिन्यात 2GB हाय-स्पीड डेटा देत आहेत. याचाच अर्थ तुम्हाला वर्षभर रिचार्ज करावे लागणार नाही. त्याचबरोबर यात जिओचा फोनही ही कंपनी देत आहे.हेदेखील वाचा- Reliance Jio युजर्ससाठी खुशखबर; रिचार्जवर मिळणार 1000 रुपयांची बक्षीसं

त्याचबरोबर जिओन 1999 रुपयांचा दोन वर्षाचा प्लान देखील आणला आहे. यातही अनलिमिटेड कॉल्स आणि दर महिना 2GB डेटा देण्यात आला आहे. तसेच रिलायन्स जिओने वर्क फ्रॉम होम कर्मचा-यांसाठी खास प्लान्स आणले आहेत.

यात 1208 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 240 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनची व्हॅलिटीडी 240 दिवसांची म्हणजेच सुमारे 8 महिन्यांची आहे. युजर्स 30 दिवसांमध्ये 30 जीबी डेटा वापरु शकतात. यात 30 जीबी डेटा संपल्यानंतर त्याचा स्पीड 64Kbps इतका होईल.

हा वर्क फ्रॉम होम प्लॅन असल्याने यात तुम्हाला कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही. मात्र Jio Apps फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. तर 3999 रुपयांच्या डेटामध्ये Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन वर्षभरासाठी दिले जाईल.