भारतीय वायुसेना लवकरच लाँच करणार मोबाईल गेम, टीजरमध्ये दिसले विंग कमांडर अभिनंदन आणि बालाकोट एअर स्ट्राइकची झलक
Indian Air Force Game (Photo Credits: Twitter@IAF_MCC)

भारतीय वायुसेना (IAF) लवकरच आपला एक ऑनलाईन मोबाईल गेम लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईल गेमचा टीजर आज लाँच झाला. या टीजरमध्ये विंग कमांडर अभिनंदन  (Abhinandan Varthaman) आणि बालाकोट एअर स्ट्राईक  (Balakot Air Strike) ची झलक पाहायला मिळाली. भारतीय वायुसेना ने आपल्या अधिकृत ट्विटर पेज वर या गेमचा टीजर लाँच केला. जवळपास 2 मिनिटांच्या या टीजरच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, हा एक सिंगल प्लेअर मोबाईल व्हिडिओ गेम आहे, ज्याला अॅनड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनसाठी तयार आहेत.

हा मोबाईल गेम येत्या 31 जुलै ला प्रदर्शित केला जाईल. तत्पुर्वी पाहा या व्हिडिओ गेमचा टीजर-

भारतीय वायुसेना ने पुढे असेही म्हटले आहे की, लवकरच ह्या व्हिडिओ गेमचे मल्टीप्लेअर व्हर्जनसु्द्धा लाँच होईल. IAF ने आपल्या चाहत्यांना असे सांगितले आहे की, हा गेम तुम्ही खूप रोमांचक आणि चित्तथरारक असा अनुभव देईल.

हेही वाचा- बालाकोट परिरात भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेला एअरस्ट्राईक हे मोठ यश - लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग

यात विंग कमांडर अभिनंदन व्यतिरिक्त मिग-21 पासून सुखोई, मिराजपासून एमआय-17 सारखे एअरक्राफ्टमध्ये दिसतील. भारताकडून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये आतंकवादी शिबीरावर जो हवाई हल्ला केला होता तो दाखवण्यात आला आहे. या हल्ल्याच्या 1 दिवसानंतर 27 फेब्रुवारी ला पाकिस्तानने जे हवाई हल्ले केले जे यशस्वी झाले नाही. भारतीय वायुसेनाने हे सर्व हल्ले नेस्तनाभूत करुन टाकले होते. तो प्रवास या गेममधून दाखविण्यात आला आहे.