14 फेब्रुवारी 2019 दिवशी पुलवामा हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान जागीच ठार झाल्यानंतर भारतीय सैन दलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला. या एअर स्टाईकवरून राजकारणी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप रंगले होते. मात्र आज GOC-in-Chief Northern Command, Lt Gen Ranbir Singh यांनी भारतीय वायुसेनेकडून बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईक हे आमचं मोठं यश असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त करण्यात यश आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ANI Tweet
GOC Northern Command: Airstrikes by IAF on Balakot terrorist infrastructure was a major achievement, wherein our aircraft went deep into enemy territory & struck terror launchpads. Pakistanis carried out air operations the following day, however they were given a befitting reply. pic.twitter.com/QyDTa6Ms04
— ANI (@ANI) May 20, 2019
लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त करण्यात यश आलं आहे. तसेच त्यादिवशी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यालादेखील भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय लष्कराने कारवाई केली, दहशतवाद्यांचा सर्वात मोठा तळ उदद्ध्वस्त केला असल्याचं भारतीय परराष्ट्र सचिवांकडून, लष्कराकडून यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. त्यावेळेस विमानाचे तुकडे पुरावे म्हणून दाखवण्यात आले होते.
सर्जिकल स्ट्राईक बाबत जम्मूमध्ये आरटीआय कार्यकर्ता रोहित चौधरीच्या प्रश्नावर चौकशी करताना ही माहिती देण्यात आली आहे. आरटीआयमध्ये 2004 आणि 2014 दरम्यान करण्यात आलेल्या सर्जिकल स्टाईकबाबत विचारणा केली होती. त्यापैकी किती यशस्वी ठरली याबाबतही विचारणा करण्यात आली होती. मोदी सरकारपूर्वी कॉंग्रेसच्या काळात सहा सर्जिकल स्टाईक झाल्याचे सांगण्यात आले आहे.