हॉटस्टार (Photo Credits: Twitter)

How to download Hotstar:  हॉटस्टार 2014 मध्ये लाँच झालेल्या सर्वात मोठ्या ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग अ‍ॅपपैकी एक आहे. हे नोवी डिजिटल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे अ‍ॅप आहे. यात 17 हून अधिक भाषांमध्ये करमणूक सामग्री यूजर्ससाठी उपलब्द आहे. आपण हॉटस्टार अ‍ॅपवर मालिका, टीव्ही कार्यक्रम, लाईव्ह कार्यक्रम, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता. हॉटस्टारमध्ये एकाधिक भाषांमध्ये स्टार टीव्ही सामग्री, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट इत्यादी खेळादयनच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा समाविष्ट आहे. आपल्या पसंतीच्या व्हिडिओंचा आनंद घेण्यासाठी आपल्या iOS, Android डिव्हाइसवर Diseny+ Hotstar डाउनलोड करणे खूप सोपे आहे. Disney+ Hotstar आयपीएल 2020 चे स्ट्रीम पार्टनर आहेत. आणि इतर बर्‍याच भारतीयांप्रमाणेच, जर आपण क्रिकेटचे चाहते असाल तर लाईव्ह आयपीएल सामने पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता.

हॉटस्टार एक असे आहे जे PC आणि अँड्रॉइड मोबाइलमध्ये सहज डाउनलोड केला जाऊ शकतो. अ‍ॅपल डिव्हाइससाठी अँड्रॉइड आणि अ‍ॅप स्टोअरसाठी गुगल प्ले-स्टोअरवर हॉटस्टार उपलब्ध आहे. आपण Android यूजर्स असल्यास आपण आपल्या डिव्हाइसवर हॉटस्टार अ‍ॅप दोन प्रकारे डाउनलोड करू शकता. पहिले प्ले स्टोअरद्वारे आणि दुसरे वेब ब्राउझरमधील हॉटस्टार apk द्वारे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स:

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आजच्या काळात अनेक यूजर्स मोबाइलवर टीव्ही पाहणे पसंत करतात. कारण कोणाकडेही टीव्ही पहायला वेळ नसतो. अशा स्थितीत, हॉटस्टार आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. याच्या मदतीने आपण आपल्या वेळेनुसार कोणताही शो कधीही कुठूनही पाहू शकता.