
भारत सरकारने देशाच्या विरोधातील अजेंडा बद्दल माहिती देणाऱ्या 20 युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. पहिल्यांदाच असे झाले की, आयटी अॅक्टमध्ये नुकत्याच सहभागी करुन घेण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारावर यावर बंदी घातली गेली आहे. या युट्यूब चॅनलसह 2 वेबसाइट वर ही बंदी घातली आहे. हे चॅनल आणि वेबसाइट कथित रुपात पाकिस्तानातून चालवले जात होते. त्याचसोबत त्यांच्याकडून भारताच्या विरोधात अजेंडा दिला जात होता.(Worst Company of 2021: Facebook 2021 मधील सर्वात वाईट कंपनी- Yahoo Finance)
या प्रकरणी कोणाचेही नाव न छापण्याचा अटीवर एका सुत्राने सांगितले की, सुचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सेक्रेटरी अपूर्व चंद्रांनी युट्यूब आणि टेलिकॉम विभागाला असे लिहिले की, कंन्टेट तत्काळ रुपात ब्लॉक करावा. कारण त्याचा भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांच्या नुसार, पाकिस्तानच्या इंटर-सर्विसेस इंटेलिजेंसच्या मदतीने हा अजेंडा पसरवला जात होता. त्यांनी असे म्हटले की, 'नवा पाकिस्तान' नावाचे एक युट्युब चॅनल होते. त्याला दोन मिलियनहून अधिक जणांनी सब्सक्राइब ही केले होते. अधिकाऱ्यांच्या मते हा चॅनल कश्मीर, कृषी कायद्याचा विरोध आणि अयोध्या सारख्या मुद्द्यांवरुन खोट्या बातम्या पसरवण्यासाठी चालवला जात होता.
या कंन्टेट संदर्भात सुरक्षा एजेंसीने माहिती दिल्यानंतर सुचना आणि प्रसारण मंत्रालयाने याबद्दल तपास केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, पहिल्यांदाच आयटी नियम 2021 अंतर्गत आपत्कालीन शक्तींचा वापर भारत विरोधातील अजेंडा असलेल्या वेबसाइटवर बंदी घालण्यासाठी लावला गेला. इकोनॉमिक्स टाइम्सच्या बातमीनुसार, एका अधिकाऱ्यांनी म्हटले तपासात असे समोर आले की या वेबसाइट आणि चॅनल हे पाकिस्तानातून चालवले जात होते. या युट्यूब चॅनलवर दाखवला जाणारा कंन्टेंट राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही आहे. तर भारताद्वारे बंद करण्यात आलेल्या युट्युब चॅनल मधील 15 चे मालकी हत्त 'नव्या पाकिस्तान' ग्रुपकडे आहेत. तर अन्य मध्ये 'द नेकेड ट्रुथ', '48 समाचार' आणि 'जुनैद हलीम अधिकारी' यांचा समावेश आहे.(Google Chrome लवकर करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी)
सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या तपासानंतर असे समोर आले की, काही व्हिडिओ, कलम 379, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तालिबानी लढवय्ये कश्मीरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे व्हिडिओ 30 लाख वेळा पाहिले गेले आहेत. या युट्यूब चॅनलवर एकूण 3.5 मिलियन सब्सक्राइबर्स होते. त्यांचा कंन्टेटला भारतात 500 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तपासात असा ही खुलासा झाला की, या चॅनल्सनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बनावट व्हिडिओ सुद्धा चालवले होते. अधिकाऱ्यांनी असे म्हटले, या चॅनल्स आणि वेबसाइटवर बंदी आणि ब्लॉक करण्याचा निर्णय 48 तासात इंटर डिपार्टमेंटल कमिटीच्या माध्यमातून घेतला जाईल. त्यानंतर आयटी नियम 2021 अंतर्गत समितीद्वारे याची पुष्टी करण्यात येईल.