Gemini AI Image (Photo Credit: Official Website)

Google's Gemini AI App Launched in India: गुगलने (Google) भारतीय वापरकर्त्यांसाठी भारतात आपला एआय चॅटबॉट जेमिनी (Gemini) लाँच केला आहे. भारतीय वापरकर्ते बऱ्याच दिवसांपासून जेमिनीच्या आगमनाची वाट पाहत होते. सध्या गुगलने हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषांमध्ये जेमिनी लाँच केले आहे. जेमिनी ॲप व्यतिरिक्त, जेमिनी ॲडव्हान्सच्या मदतीने वापरकर्ते आता कमी वेळेत अधिक माहिती गोळा करू शकतील, तेही त्यांच्या सोयीच्या भाषेत.

याशिवाय, याचा वापर करून तुम्ही अनेक कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. गुगलने आपल्या एआय चॅटबॉट जेमिनीमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देखील दिली आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून जेमिनी लॉन्च झाल्याची बातमी दिली. सुंदर पिचाई भारतात एआय चॅटबॉट जेमिनी लाँच झाल्याबद्दल खूप आनंदी आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी सांगितले की, ‘आज आम्ही भारतात जेमिनी मोबाईल ॲप लाँच करत आहोत, जे इंग्रजी आणि इतर 9 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. या स्थानिक भाषांव्यतिरिक्त, आम्ही जेमिनी ॲडव्हान्समध्ये इतर नवीन फीचर्सदेखील जोडत आहोत.’

जेमिनी वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना गुगल प्लेवरून हे ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपमध्ये फाईल अपलोड करणे, इंग्रजीमध्ये चॅट करण्याची क्षमता आणि डेटा विश्लेषणाची सुविधा देखील दिली आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्ते जेमिनी वापरण्यास सक्षम असतील. जर तुम्ही चॅटजीपीटी वापरले असेल तर, तुम्हाला जेमिनी वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. गुगलने भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि तुर्कीमध्येही जेमिनी ॲप लाँच केले आहे.