Google's 23rd Birthday: गूगलच्या 23 व्या वाढदिवसानिमित्त खास केक थीम्ड डूडल
Google Doodle | PC: Google Home Page

जगातलं आघाडीचं सर्च इंजिन गूगल (Google) आज 23 वा वाढदिवस (Google 23rd Birthday) साजरा करत आहे. आज बर्थ डे दिवशी स्पेशल केक थीम डूडल साकारण्यात आलं आहे. 1997 साली गूगलची स्थापना झाली. पण 27 सप्टेंबर 1998 पासून अधिकृतरित्या गूगल ही कंपनी म्हणून अस्तित्त्वामध्ये आली. 1997 साली गूगलचे को फाऊंडर Sergey Brin हे Larry Page या त्यांना भेटले. या दोघांनी गूगल साकारले. त्यावेळी हे दोघेही Stanford University चे पदवीधर होते. त्यांच्या कल्पनाशक्ती आणि मेहनतीमधून गूगल हे सर्च इंजिन अस्तित्त्वामध्ये आलं. 1998 साली Google Inc अस्तित्त्वामध्ये आलं.

आज गूगलच्या होम पेज वर गूगल मधील अक्षरांमध्ये L हे अक्षर मेणबत्तीच्या जागी आहे. तर केक थीम वर साकरलेल्या गूगल डूडलला अ‍ॅनिमेटेड देखील करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Happy Birthday Google : गूगलच्या नावापासून त्याच्या संस्थापकांबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी.

गूगलच्या 23 व्या वाढदिवसाचं अ‍ॅनिमेटेड डूडल

दरम्यान तांत्रिकदृष्ट्या गूगलचा निर्मिती ही 4 सप्टेंबर 1998 ची आहे. त्यामुळे पहिली 7 वर्ष कंपनीची अ‍ॅनिव्हरसरी ही त्याच दिवशी होत होती. नंतर त्याचं सेलिब्रेशन 27 सप्टेंबरला करण्याची सुरूवात झाली जेव्हा सर्च इंजिनच्या इंडेक्सिंगचे नंबर जाहीर झाले. नक्की वाचा: Google Search साठी आले Dark मोड फिचर, युजर्सला 'या' पद्धतीने करता येईल अॅक्टिव्हेट.

सध्या गूगलच्या सीईओ पदी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहे. 24 ऑक्टोबर 2015 साली त्यांची नियुक्ती झाली. सुंदर पिचाई Alphabet Inc चे देखील 3 डिसेंबर 2019 साली सीईओ झाले.