Happy Birthday Google :  गूगलच्या नावापासून त्याच्या संस्थापकांबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी
गूगल Photo Credits Google

गूगल आज 20 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. इंग्रजीसोबतच आता हिंदी, मराठीसारख्या भारतीय भाषांमध्येही गूगल सर्च इंजिनने आपली सेवा सुरू केली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये युजर्सना धन्यवाद म्हणण्यासाठी गूगलच्या होमपेजवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ पाहून तुमच्याही मनात कधी काळी तुम्ही सर्च केलेले लहान सहान प्रश्न डोक्यात येऊन गेले असतील. गूग़ल हे इंटरनेट राज्य करत असलेलं एक प्रभावी सर्च इंचिन आहे. म्हणून त्याबबातच्या काही इंटरेस्टिंग गोष्टीही जाणून घ्या

  • गूगल हे नाव पडण्यावरूनही अनेक गंमतीजंमती घडल्या आहेत. गूगलच्या नावाचं स्पेलिंग मूळ GOOGLE असं होतं. परंतू चूकीने ते GOOGOL असं लिहण्यात आलं. 'गूगल'चं नाव त्यापूर्वी काय होतं तुम्हांला ठाऊक आहे का ? ...असे पडले 'गुगल' हे नाव !
  • गूगल कंपनी सर्जी ब्रिन आणि लैरी पेज यांनी स्थापन केली. एका टप्प्यावर त्यांनी गूगल कंपनी विकण्याचा विचार केला होता. गूगल कंपनी 1 मिलियन डॉलर्सला विकण्याचा त्यांचा विचार होता मात्र एक्साईट कंपनीने हा सौदा 750000 डॉलरचा केला.  सुरूवातीच्या काळात   सर्जी ब्रिन आणि लैरी पेज हे एकमेकांसोबत सतत भांडत असत. त्यांचे वैचारिक मतभेद होते.
  • गूगल कंपनीने केलेलं पहिलं ट्विट हे बायनरी नंबरमध्ये होतं. गूगलचं पहिलं ट्विट '“I’m 01100110 01100101 01100101 01101100 01101001 01101110 01100111 00100000 01101100 01110101 01100011 01101011 01111001 00001010.” असं होतं. ज्याचा अर्थ ' im feeling lucky' असा होतो. गूगलच्या सर्च बारवर आजही हेच वाक्य दिसतं.
  • लेरी पेज नंतर भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे गूगलचे सीईओ झाले आहेत.