गूगलने (Google) आपल्या Google Play Store मधून 18 SpyLoan apps काढून टाकल्याची माहिती दिली आहे. ESET च्या रिपोर्ट्सनुसार, ही 18 अॅप्स 'SpyLoan'म्हणून असल्याचं सांगत त्यांच्यावर गूगलने कारवाई केली आहे. या अॅप्सच्या मदतीने युजर्सच्या मोबाईल मधील माहितीवर लक्ष ठेवले जात होते. या माहितीचा वापर करून नंतर कर्ज घेतलेल्यांना ब्लॅकमेल देखील केले जात होते. त्यांच्याकडून पैसे परत न केल्यास अधिक प्रमाणात व्याज लावून पैसे उकळले जात होते.
गूगल प्ले स्टोअर वर या स्पाय लोन अॅप्स वर देखील कोट्यावधींची डाऊनलोड्स होती. गूगल प्ले स्टोअर सोबतच हे अॅप्स थर्ड पार्टी अॅप आणि काही वेबसाईट्स वर देखील उपलब्ध आहेत. नक्की वाचा: Google Pay वापरत आहात मग फ्रॉड टाळण्यासाठी 'ही' अॅप्स वापरणं टाळण्याचा गूगलचा सल्ला .
स्पाय लोन अॅप 2020 मध्ये पहिल्यांदा दिसली होती मात्र मागील वर्षाभरात ती Android आणि iOS वर अधिक प्रमाणात वापरली गेली आहेत. भारतासोबतच मॅक्सिको, थायलंड, इंडोनेशिया, नायजेरिया, फिलिपिन्स, इजिप्त, व्हिएतनाम, सिंगापूर, केनिया, कोलंबिया आणि पेरू मध्ये त्याचा विळखा अधिक असल्याचं समोर आलं आहे.
अॅप्स कोणती?
गूगलने कारवाई केलेल्यांमध्ये AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash यांचा समावेश आहे. यापैकी कोणती अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ती तातडीने काढून टाकण्यात शहाणपण आहे.