Google Play Store (Photo Credit mundoejecutivo.com)

गुगलकडून (Google) 6 खतरनाक अॅप Play Store वरुन हटवले आहेत. गुगल कडून जे अॅप्स हटवले आहेत. त्यामध्ये स्कॅनर, 2 सेफ्टी अॅप लॉक, पुश मेसेज, इमोजी वाल्पर, सेपेरेट डॉक स्कॅनर, फिंगरप्रिंट गेम बॉक्स सारखे अॅपचा समावेश आहे. हे सर्व अॅप मॅलवेअर संक्रमित असल्याचे आढळून आले आहेत. युजर्स डेटा सिक्युरिटीच्या कारणास्तव हे अॅप्स धोकादायक कॅटेगरीमध्ये ठेवले आहेत. त्याचसोबत युजर्सला हे अॅप्स न वापरण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे. या अॅप्सवर मलीशश कंन्टेंट आढळून आला आहे. अशातच हे अॅप्स तुम्ही वापरत असल्यात ते तुम्ही तातडीने डिलिट करा.

सायबर सुरक्षितता संबंधित विशेषज्ञांच्या मते, स्कॅनर 2, सेफ्टी अॅप लॉक, पुश मेसेज, इमोजी वाल्पर, सेपेरेट डॉक स्कॅनर, फिंगरप्रिंट गेम अॅपच्या Google Play Store वर एकूण दोन लाख वेळा डाऊनलोड केले आहेत. गुगल कडून सध्या हे सर्व अॅफ प्लेस्टोरवरुन हटवले आहेत. परंतु हे अॅप अद्याप सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये असल्यास ते स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरु शकतात. गेल्या वर्षात सुद्धा 100 हून अधिक अॅपमध्ये मॅलवेअर आढळून आले आहेत.(TikTok खरेदी करण्याबाबत गूगलचा विचार काय? सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केली भूमिका)

दरम्यान, संक्रमित अॅप्स कोणते आहेत ते जाणून घेणे सोपे नाही. सायबर सिक्युरिटी फर्म प्रेडियोने युजर्सला हे अॅप तातडीने हटवण्याचा सल्ला दिला आहे. गुगलने 2017 ते आतापर्यंत प्लेस्टोर वरुन जोकर मालवेअर असणारे 17 हजारहून अधिक अॅप हटवले आहेत. या वर्षाच्या जुलैमध्ये सायबर सिक्युरिटी फर्मचे रिसर्चरने Google Play Store वर जोकर ड्रॉपर आणि प्रीमियम डायलर स्पाइवेअरच्या एका नव्या सॉफ्टवेअर पकडला असून जो विविध प्रकारच्या चुका करण्यास सक्षम होता. हे युजर्सच्या परवानगीशिवाय काही सर्विस सुरु केला जात होता.