Pixel 3a XL (Photo Credits-Twitter)

गुगलने Pixel 3a आणि Pixel 3a XL या स्मार्टफोनची विक्री करणे बंद केले आहे. या डिवायसची इनवेंट्री पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच डिवाइस ऑनलाईन स्टोर येथून सुद्धा सोल्डआउट केले आहे. या स्मार्टफोनचा स्टॉक फक्त आता रिटेलर्स यांच्याकडे उपलब्ध आहे.  अमेरिकेतील ऑनलाईन स्टोरमध्ये पिक्सल 3a स्मार्टफोन लिस्टिंगमध्ये Out Of Stock म्हणून दाखवले जात आहे. तसेच पेज सुद्धा एक्सेसेबल नाही आहे. दुसऱ्या बाजूला Pixel 3 सीरिज सुद्धा हटवण्यात आली आहे. Pixel 3a सीरिज गेल्या वर्षात मे महिन्यातच लॉन्च करण्यात आली होती. युजर्सला या स्मार्टफोनमधील कॅमेरासह अन्य फिचर्स सुद्धा पसंदीस पडले होते.

कंपनीन आता Pixel 4a स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन Google Pixel 3a सीरिज पेक्षा हटके आणि शानदार कॅमेऱ्यासह शिखाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. गुगलकडून नवे डिवाइस पिक्सल 4ए च्या लॉन्चिंगची तारीख पुढे ढकलली आहे. तसेच कधी हा स्मार्टफोन लॉन्च करणार त्याबाबत ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.(टिकटॉकला टक्कर देणाऱ्या चिंगारी अॅपला युजर्सचा तुफान प्रतिसाद; गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 10 लाख डाऊनलोड्स)

Pixel 4a स्मार्टफोनमध्ये 5.81 इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.  फोनमध्ये Snapdragon 730 SoC प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये रियर कॅमेरा, 4GB रॅमसह 6GB आणि 128GB स्टोरेजचा ऑप्शन मिळणार आहे.  या स्मार्टफोनच्या अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 3040mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. गुगलचा हा स्मार्टफोन Android V10 (Q) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोन 4G,3G,2G ला सपोर्ट करणार आहे. तसेच जीपीएस, ब्लूटूथ, वायफाय आणि ओटीजी सारखे फिचर्स ही दिले जाणार आहेत.