Chingari Video App is an alternative to China's TikTok (Photo Credits: Twitter)

चायनीज टिकटॉक (TikTok) अॅपला टक्कर देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या चिंगारी (Chingari) अॅपला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. देशात चीनी अॅपला बंदी घालण्यात आल्यानंतर भारतीय बनावटीच्या चिंगारी अॅपकडे युजर्सने मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी (3 जुलै) गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) या अॅपचे 10 मिलियनहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत. तसंच गेल्या आठवड्यापासून चिंगारी अॅप प्ले स्टोअरवर टॉप टू (Top 2) मध्ये आहे. (TikTok ला टक्कर देण्यासाठी भारतीय Chingari App सज्ज? व्हिडिओ बनवण्यासाठी युजर्सला मिळत आहेत पैसै)

"आमचे वाढते युजर्स आणि अॅपमधील डेली एन्गेजमेंट टाईम (daily engagement time) हा प्रगतीचा एक पुरावा आहे. सर्व युजर्संना चांगला अनुभव मिळावा यासाठी आमची टीम अखंड काम करत आहे," असे चिंगारी अॅपचे को-फाऊंडर बिस्वात्मा नायक यांनी सांगितले आहे. तर "चिंगारी अॅपवर या आणि अनुभव घ्या. कारण हा अॅप 100% भारतीय बनावटीचा आहे," असे चिंगारी अॅपचे को-फाऊंडर सुमीत घोष यांनी टिकटॉक युजर्संना आवाहन केले आहे.

पहा ट्विट:

यापूर्वी 10 दिवसांत अॅपचे 3 मिलियन डाऊनलोड्स झाले होते. तर 72 तासांत 500,000 लोकांनी चिंगारी अॅप डाऊनलोड केला होता. विशेष म्हणजे हा अॅप इंग्रजी, हिंदी, बांग्ला, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि तेलगु या भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतात 59 चायनीज अॅप बॅन केल्यामुळे देशभरातील सर्व डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा उपयोग करुन चॅट, शॉर्ट व्हिडिओज, फोटो, व्हिडिओ शेअरिंग साठी देसी अॅप बनवू शकतात.