Google ची नवी शॉपिंग वेबसाईट लॉन्च; Flipkart-Amazon ला टक्कर
Google (Photo: Shutterstock)

लोकप्रिय सर्च इंजिन कंपनी गुगल ने (Google) भारतात ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट (Online Shopping Website) लॉन्च केली आहे. गुगलने उचलेल्या या नव्या पाऊलामुळे भारतात पूर्वीपासून लोकप्रिय असलेल्या ई-कॉमर्स वेबसाईट्स Flipkart, Amazon आणि Paytm यांना आव्हान मिळू शकते. गुगलचे व्हाईस प्रेसिडेंट सुरोजीत चटर्जी यांनी सांगितले की, "गुगल शॉपिंगचा नवा अनुभव ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत. या वेबसाईटमुळे ग्राहकांना कोणत्याही प्रॉडक्टवर चालू असलेल्या ऑफर्सचा फायदा घेता येईल आणि त्याचबरोबर ग्राहक योग्य प्रॉडक्टची निवड करु शकतील."

Google Shopping चा मदतीने ग्राहक मल्टीपल ई कॉमर्स साईट्सवर मिळत असलेल्या बेस्ट ऑफर्स एकत्र पाहू शकतील. ज्यात रिटेलर्सचाही समावेश असेल. Google Shopping युजर्सला योग्य आणि युजर फ्रेंडली शॉपिंगचा अनुभव देईल. गुगलने या प्लॅटफार्मवर डेडिकेटेड सेक्शन्स जोडले आहेत. ज्यात प्राईस ड्रॉप्स, टॉप डिल्स आहेत. आणि तुम्ही गुगल वर या टॉप डिल्स एकत्र पाहू शकता. याशिवाय मोबाईल फोन, स्पीकर्स, बुक्स, वॉचेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, अप्लायसेंज इत्यादींचा समावेश आहे.

यात तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजेंस पावर्ड शॉपिंगचा अनुभव घेता येईल. Google Lens च्या मदतीने तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट स्कॅन करुन सर्च करु शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनचा कॅमेरा वापरावा लागेल. रिटेलर्स देखील या साईटवर स्वतःला रजिस्टर करु शकतात. यासाठी गुगलवर मर्चेंट सेंटरचा वापर करावा लागेल. मर्चेंट सेंटर इंग्रजीबरोबरच हिंदी भाषेतही उपलब्ध असेल.