Sundar Pichai, Google (फोटो सौजन्य - Instagram, Pixabay)

Google More Layoffs: गुगल (Google) चे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी अलीकडच्या काही टाळेबंदीनंतर त्यांच्या कर्मचार्‍यांना येत्या काही महिन्यांत आणखी नोकऱ्या कपातीचा (Layoffs) इशारा दिला आहे. यासंदर्भात द व्हर्जने वृत्त दिले आहे. सुंदर पिचाई यांनी एका मेमोमध्ये म्हटले आहे की, या वर्षी कंपनीमध्ये वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमधून कर्मचारी कपात करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी अल्फाबेटच्या मालकीच्या कंपनीने त्यांच्या व्हॉईस असिस्टंट आणि हार्डवेअर विभागांमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आता काही दिवसांनीचं पिचाई यांनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात होणार असल्याचा इशारा दिला आहे. मागील टाळेबंदीचा सर्वाधिक फटका Google Nest, Pixel, Fitbit, जाहिरात विक्री टीम आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी टीमला बसला होता.

जानेवारी 2023 मध्ये, Alphabet ने 12,000 नोकर्‍या, किंवा 6%, जागतिक कर्मचार्‍यांमध्ये कपात करण्याची योजना जाहीर केली होती. सप्टेंबर 2023 पर्यंत, कंपनीचे जागतिक स्तरावर 182,381 कर्मचारी होते. Google च्या इतिहासातील ही सर्वात मोठी टाळेबंदी होती. परंतु, कंपनीसाठी ती आवश्यक होती, असे पिचाई यांनी सांगितले. (हेही वाचा -AI to Hit Jobs: एआयमुळे जगभरातील 40% नोकऱ्या येऊ शकतात धोक्यात; IMF ने दिला इशारा, श्रीमंत देशांना जास्त धोका)

गुगलने या टाळेबंदीमध्ये मोठ्या टेक फर्मने फिटबिटचे सह-संस्थापक जेम्स पार्क आणि एरिक फ्रीडमन यांना कामावरून काढून टाकले. तथापी, आता टेक कंपनीने 2024 च्या सुरुवातीला अनेक विभागातील टाळेबंदीला सुरुवात केली. कारण, आता टेक कंपनीने अनेक विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये गुंतवणूक करणे सुरू केले आहे. यामुळे कंपनीचा खर्च कमी होणार आहे. (हेही वाचा - Amazon Prime Layoffs: अॅमेझॉनने केली नोकर कपातीची घोषणा; प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो लोकांना काढून टाकणार)

याशिवाय, Google आणि Amazon सारख्या जागतिक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी जानेवारी 2024 च्या पहिल्या दोन आठवड्यात शेकडो कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. पुढील काही महिन्यांत AI मधील प्रगतीमुळे आणखी नोकर कपात होण्याची शक्यता आहे. Layoffs.fyi या ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, जानेवारीमध्ये एकूणच, तंत्रज्ञान कंपन्यांनी आतापर्यंत 7,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन-समर्थित ट्विटर आणि मायक्रोसॉफ्ट-समर्थित HumaneAI मधील नोकर कपातीचा समावेश आहे.

Amazon.com ने गेल्या आठवड्यात आपल्या स्ट्रीमिंग आणि स्टुडिओ ऑपरेशन्समध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अॅमेझॉन आणि Google दोघेही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शर्यतीत मायक्रोसॉफ्टशी थेट स्पर्धा करत कंपनीमधील नोकऱ्या आणि संरचना सुव्यवस्थित करण्यासाठी एआय डेव्हलपमेंटमध्ये अब्जावधींची गुंतवणूक करत आहेत.