Gmail Tips and Tricks: सध्या सर्वजण एखाद्याला ईमेल पाठवण्यासाठी Gmail चा पर्याय वापरतात. या माध्यमातून अत्यंत सहजपणे ईमेल पाठवला जातो. परंतु काही जण घाईघाईने चुकून भतल्याच व्यक्तीला ईमेल पाठवतात. अशातच चुकून एखाद्याला पाठवण्यात आलेला मेल डिलिट कसा करायचा हा प्रश्न उपस्थितीत होतो. याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याच्या आधारे तुम्हाला एखाद्याला चुकून पाठवलेला ईमेल डिलिट कसा करायचा हे कळणार आहे.(Geomagnetic Storm: भू-चुंबकीय वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता, GPS प्रणाली, मोबाई, इंटरनेट सेवांना धोका)
दुसऱ्या व्यक्तीला गेलेला ईमेल डिलिट करण्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. तर जाणून घ्या याबद्दल अधिक.(WhatsApp चॅट्स iPhone मधून Samsung फोनमध्ये कसे ट्रान्सफर कराल? जाणून घ्या iOS मधून Android Mobiles मध्ये बॅकअप घेण्याची पद्धत)
-प्रथम तुमच्या कंप्युटर आणि लॅपटॉप मध्ये Gmail सुरु करा.
-आता उजव्या बाजूला सेटिंग्स चा ऑप्शन दाखवला जाईल त्यावर क्लिक करा.
-असे केल्यानंतर Undo Send चे ऑप्शन मिळेल.
-येथे तुम्हाला कॅलिलेशन टाइमचा ऑप्शन दाखवला जाईल आणि त्यानुसार तुम्ही टाइम सेट करु शकता.
-आता हे फिचर अॅक्टिव्हेट होईल.
-एखाद्याला ईमेल पाठवाल त्याच्याच खाली Undo चे बटण दाखवले जाईल.
-येथून तुम्ही पाठवण्यात आलेला ईमेल सहज डिलिट करु शकता.
दरम्यान, गुगलने गेल्या वर्षात आपल्या गुगल मीट प्लॅटफॉर्मवर खास फिचर लॉन्च केले होते. त्याचे नाव Noise Cancellation असे होते. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला व्हिडिओ कॉफ्रेन्सिंगच्या वेळी आजूबाजूचा आवाज ब्लॉक करता येणार आहे. हे फिचर आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानावर आधारित आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, हे फिचर वर्क फ्रॉम होम करण्याऱ्यांसाठी युजर्सच्या कामी येणार आहे.