Flipkart New Year Sale: आज रात्रीपासून सुरु होणार फ्लिपकार्टचा नवीन वर्षातील महासेल; 80 टक्क्यांपर्यंत मिळणार सवलत
Flipkart (Photo Credits: File Photo)

नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि त्यासह फ्लिपकार्टच्या (Flipkart) नवीन वर्षाच्या सेलचीही (Flipkart Flipstart Days 2020) घोषणा झाली आहे. या सेलमध्ये नेहमीप्रमाणे फ्लिपकार्ट शेकडो उत्पादनांवर भारी सवलत देत आहे. 1 जानेवारीच्या रात्रीपासून हा सेल सुरु होईल, तो 3 जानेवारीपर्यंत चालेल. या निमित्ताने एक्सचेंज ऑफरबरोबरच तुम्हाला आणखीही अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जातील. सेल दरम्यान, ग्राहकांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नो-कॉस्ट पेमेंट ऑप्शन, एक्सटेंड वॉरंटी आणि ग्राहकांना निवडक डेबिट कार्डवर ईएमआय पर्यायही मिळतील. कंपनीने आपल्या वेबसाइटवर सेलसाठी लँडिंग पेज देखील तयार केले आहे, जिथे ग्राहक आगामी ऑफरची झलक पाहू शकतात.

माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर या सेलदरम्यान 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये हेडफोन आणि स्पीकर्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. टीव्ही आणि होम अ‍ॅपलाइन्सवर 75% पर्यंत सूट असेल, तर फ्लिपकार्ट ब्रांडेड उत्पादनांवर 80% पर्यंत सूट दिली जाईल. नवीन वर्षाच्या संध्याकाळी आपण एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेत असाल, तर फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला चांगल्या ऑफरमध्ये मोबाईल फोन मिळू शकतो. सेलदरम्यान उपलब्ध असलेल्या उत्पादनांपैकी सर्वाधिक मागणी असणारे, रेडमी आणि रियलमीचे स्मार्टफोन या सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. (हेही वाचा: खुशखबर! Nokia 4.2 स्मार्टफोन मिळतोय अर्ध्या किंमतीत; पाहा कुठे मिळतेय ही भन्नाट ऑफर)

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Acer Swift 3,  44,990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. सहसा हा लॅपटॉप ग्राहकांना 50,000 रुपयांमध्ये उपलब्ध असतो. या लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅमसह इंटेल कोर आय 5 प्रोसेसर आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट ही भारतातील एक नामांकित ई-कॉमर्स कंपनी आहे. सध्या तिची स्पर्धा अ‍ॅमेझॉनशे आहे. नुकतेच फ्लिपकार्टने अ‍ॅमेझॉन प्राइमची लोकप्रियता विचारात घेऊन, आपलीही व्हिडीओ सर्व्हिस सुरू केली आहे.