Fire-Boltt Beast Smartwatch भारतात लॉन्च; Meditative Breathing फिचरसह काय आहे खासियत आणि किंमत? जाणून घ्या
Fire-Boltt Beast (Photo Credits: Fire-Boltt)

Fire-Boltt कंपनीने नवा affordable smartwatch आज भारतात लॉन्च केला आहे. Beast असे या स्मार्टवॉचचे नाव असून यामध्ये फुल एचडी डिस्प्ले सह अनेक हेल्थ टूल्स दिले आहेत. या स्मार्टवॉचची भारतातील किंमत 3,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.6 इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. हे स्मार्टवॉच अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, 24x7 हार्ट रेट आणि मेडिटेटीव्ह ब्रिथिंग (Meditative Breathing) सारखे फिचर्स आहेत. योगसाधना किंवा ध्यानधारणा करताना योग्य ब्रिथिंग मोजण्याचे योग्य फिचर यामध्ये देण्यात आले आहे.

या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल मोजली जाते आणि त्यासोबतच हार्ट रेड, ब्लड प्रेशर देखील मोजले जाते. आपण चालत किंवा व्यायाम करत असताना हे स्मार्टवॉच अगदी अचूक रिडिंग देते, अशी माहिती Fire-Boltt चे को-फाऊंडर्स आयुषी आणि अर्णव किशोरे यांनी आपल्या निवदेनात दिली आहे. (Amazfit Bip U Pro स्मार्टवॉच भारतात लाँच, या वॉटरप्रूफ घड्याळाचे 'हे' खास वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे का?)

या स्मार्टवॉचमध्ये इंटिलिजन्स स्पोर्ट्स अँड फिटनेस ट्रॅकिंग सिस्टम असल्यामुळे या वॉचच्या आधारे तुम्ही तुमच्या दैनंदिन अॅक्टीव्हीजचा देखील आढावा घेऊ शकता. यासोबतच या स्मार्टवॉच मध्ये मल्टीपल स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आला आहे. या स्मार्टवॉच मध्ये स्लीप क्वॉलिटी ट्रॅकरसारखे आधुनिक फिचर्स देखील अॅड केले आहे. या स्मार्टवॉचची बॅटरी अधिक काळ चालणारी असून 8 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप चालेल असा कंपनीचा दावा आहे. IP67 सर्टिफिकेशन पास केल्यामुळे हे स्मार्टवॉच स्वेटप्रुफ आणि वॉटरप्रुफ देखील आहे.