Amazfit Bip U Pro Smartwatch (Photo Credits: Twitter)

घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे जग आता स्मार्टवॉचच्या तालावर नाचायला लागलं आहे असे म्हणायला हरकत नाही. सकाळी उठण्यापासून, व्यायामापासून ते झोपेपर्यंतच्या सर्व वेळा हे स्मार्टवॉच ठरवून देते. त्यामुळे बाजारात देखील या स्मार्टवॉचची प्रचंड क्रेज आहे. ही क्रेज पाहता Amazfit ने आपले नवे स्मार्टवॉच लाँच केले आहे. Amazfit Bip U Pro असे या स्मार्टवॉचचे नाव असून येत्या 14 एप्रिलला हे स्मार्टवॉच ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टवॉचचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात Amazon Alexa देखील इनबिल्ट केले आहे.

Amazfit Bip U Pro स्मार्टवॉचच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, याची किंमत 4,999 रुपये इतकी आहे. अॅमेजॉन इंडियावर आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर हा विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टवॉच तीन रंगात उपलब्ध होईल. काळा, हिरवा आणि गुलाबी या तीन रंगात हे स्मार्टवॉच उपलब्ध करण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Realme C20, Realme C21 आणि Realme C25 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमतीविषयी

या स्मार्टवॉचमध्ये आरोग्यासाठी महत्त्वाचे असे हार्ट रेट मॉनिटरिंग सेंसर, SpO2 ब्लड ऑक्सीजन मीटर सारखे फिचर देण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये 5ATM वॉटर रेसिस्टंस फिचर असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्टवॉच 50 फूट खोल पाण्यात देखील तुम्हाला वापरता येऊ शकते.

Amazfit Bip U Pro स्मार्टवॉच डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.43 इंचाची HD TFT LCD कलर डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. यात 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सुद्धा दिला आहे. जो अँटी फिंगरप्रिंट कोटिंगससह येतो. या स्मार्टवॉचच्या डिस्प्लेमध्ये 50 वॉच फेसेस मिळतील. त्याशिवाय यात यूजर आपला फोटो देखील लावू शकता. यात स्ट्रेस मॉनिटरिंग, ब्रीदिंग ट्रेनिंग सारखे फीचर्ससुद्धा मिळतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात Alexa इनबिल्ट आहे. ज्यामुळे स्मार्टवॉचमध्ये तुम्ही म्यूजिक कंट्रोल देखील करु शकता. त्याचबरोबर ट्रॅफिक अपडेट, वेदर अपडेट, स्पोर्ट्स अपडेट सुद्धा मिळतील. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 9 तास चालते.