WhatsApp Bug शोधणार्‍या मणिपूर च्या Zonel Sougaijam चा फेसबूक कडून गौरव; लाखो रूपयाचं बक्षीस आणि 'Facebook Hall of Fame 2019' यादीत नावं!
Whats App Bug (Photo Credits: Unsplash)

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे केवळ चॅटिंग अ‍ॅप राहिले नाही. यामधील विविध फीचर्सचा उपयोग करून व्यवसायापासून थेट व्हिडिओ कॉल करण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र व्हिडिओ कॉलिंग दरम्यान युजर्सच्या प्रायव्हसीचा भंग होत असल्याचं एका मणिपुरी इंजिनियरने समोर आणलं आहे. हा व्हॉट्सअ‍ॅप बग शोधल्याप्रकरणी त्याला फेसबूकने 500 अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस आणि 'Facebook Hall of Fame 2019'मध्ये नाव समाविष्ट करून गौरवण्यात आलं आहे.

मणिपूर येथील इंफाळ येथे Zonel Sougaijam या 22 वर्षीय सिव्हिल इंजिनियरने हा व्हॉट्सअ‍ॅप बग शोधून काढला आहे. 'Facebook Hall of Fame 2019'या प्रतिष्ठित यादीमध्ये 94 जणांमध्ये त्याचं नाव 16 व्या स्थानी आहे.

काय होता व्हॉट्सअ‍ॅप बग?

व्हॉट्सअ‍ॅप द्वारा व्हॉईस कॉल केल्यानंतर तो युजर्सच्या परवानगीशिवाय व्हिडिओ कॉलसाठी अपग्रेड होत असे. त्यामुळे बोलता बोलता थेट ते एकमेकांना पाहु शकत होते. हा दोष Zonel Sougaijam ने फेसबुकला दाखवून दिला. त्यानंतर 15-20 दिवसात त्यावर ठोस उपाय करण्यात आला.

फेब्रुवारी 2014 साली फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने व्हॉट्सअ‍ॅप हे चॅटिंग अ‍ॅप विकत घेतले आहे.