Facebook Logo

सोशल मीडियावरील मायक्रो ब्लॉगिंग साईट Twitter यांनी नुकतेच दिवाळी निमित्त खास इमोजी युजर्ससाठी रोलआउट केले. त्यानंतर आता फेसबुकने सुद्धा दिवाळीसाठी पूर्णपणे तयारी केली आहे. दिवाळी अत्यंत खास आणि वर्च्युअल पद्धतीने साजरी करण्यासाठी यंदा दिवाळी रेडी अवतार आणि Challenge Your Friends and Family सारखे फिचर्स लॉन्च केले आहेत. याचा वापर करुन युजर्सला आपल्या फेसबुक फ्रेंडला फोटो किंवा व्हिडिओ तयार करुन #DiwaliAtHomeChallenge असा हॅशटॅग वापरुन पाठवू शकता. तर येथे जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक माहिती.(Facebook and Instagram Removed Fake Accounts: फेसबुक ने जगभरात हजारो बनावट खाती हटविली; इन्स्टाग्रामनेही जवळपास 900 खाती केले डिलिट)

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता फेसबुकने दिवाळीच्या सणानिमित्त #DiwaliAtHomeChallenge आणले आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, युजर्सला आपल्या आवडीची Theme Background तयार करुन मित्रांसोबत सेलिब्रेट करु शकता. या फिचरचा वापर करुन युजर्सला फेसबुक अॅपच्या माध्यमातून फेसबुक अवतार तयार करावा लागणार आहे.

जर तुम्हाला सुद्धा या फिचरचा वापर करायचा असल्यास यासाठी फेसबुक अॅपचा वापर करावा लागणार आहे. त्यानंतर Create Post येथे जाऊन Background वर क्लिक करा. तेथेच पुढे Diwali Background लिहून शेअर करा. असे केल्यानंतर हे चँलेंज तुम्हा मित्रपरिवारासह साजरा करु शकतात. तुम्ही एखाद्या मित्राला सुद्धा नॉमिनेट करु शकतात.(WhatsApp कडून Store Management Tool लॉन्च, अनात्यावश्यक फाइल्स डिलिट करणे होणार सोप्पे)

फेसबुकने दिवाळीच्या सणासाठी युजर्सला पर्सनलाइज्ड ग्रिटिंग्ससुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. युजर्सला आपल्या आवडीनुसार स्वत:हून ग्रिटिंग्स तयार करुन मित्रपरिवारासह शेअर करु शकतात. युजर्सला लाइट बल्ब, कँन्डल होल्डर्स, दिवा आणि कंदील Recyle करुन DIY व्हिडिओ तयार करु शकतात.