WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

फेसबुकच्या मालकिचे हक्क असलेले अॅप WhatsApp युजर्ससाठी नवे-नवे अपडेट्स रोलआउट केले जातात. याच पार्श्वभुमीवर व्हॉट्सअॅप कडून एक नवे अपडेट लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या अपडेट फिचरला स्टोर मॅनेजमेंट टूल असे नाव दिले आहे. जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. व्हॉट्सअॅपकडून सध्या Storage Managemeny Tool लॉन्च केले गेले आहे. तर पुढील आठवड्यापासून संपूर्ण जगभरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप मध्ये 7 दिवसानंतर आपोआप डिलीट होणार पाठवलेले मेसेजेस, जाणून घ्या काय आहे हे Disappearing Messages फिचर)

कंपनीने दावा केला आहे की, Storage Management Tool रोलआउट झाल्यास युजर्सला फोनमधील चॅट, मीडिया फाइल्स संबंधित सोपे होणार आहे. त्याचसोबत युजर्सला व्हॉट्सअॅपवरील चॅट किंवा मेसेजसह मीडिया फाइल्स सोप्प्या पद्धतीने आणि बल्क मध्ये डिलिट करता येणार आहेत. कंपनीकडून Easy Cleanup चे ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजेच जेवढी मोठी फाइल्स आणि मीडिया कंन्टेंट बहुतांश वेळा फॉरवर्ड केला गेला आहे किंवा मीडिया कंटेट बद्दल युजर्सला माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये कमी साइज ते मोठ्या साइज मधील फाइल्स एकाच साइजमध्ये प्लेस केल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्च करण्यास सोपे होणार आहे. तर स्टोर मॅनेजमेंट टूल फाइल डिलिट करण्यापूर्वी प्री-व्यू ऑप्शन ही दाखवले जाणार आहे.

युजर्सला हे ऑप्शन वापरण्यासाठी व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जावे लागणार आहे. तेथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा ऑप्शन दाखवला जाणार आहे. यानंतर मॅनेज स्टोरेज ऑप्शन एक्सेस करता येणार आहे.