Dhanteras Offers 2021: धनतेरस निमित्त Flipkart आणि Amazon वर Gold - Silver Coin पासून TV, Smartphones खरेदीसाठी या आहेत धमाकेदार ऑफर्स
धनत्रयोदशी किंवा धनतेरस Photo Credits : Facebook

भारतामध्ये दिवाळी ही मोठ्या उत्साहाने, आनंदाने, चैत्यन्याने साजरी केली जाते. कुटुंबियांसोबतच दिवाळी पाडव्याला आपल्या साथीदाराला तर भाऊबीजेला आपल्या भावंडांना दिवाळी निमित्त भेटवस्तू दिल्या जातात. पाच दिवसांच्या दिव्यांच्या या सणाला धनतेरस पासून सुरूवात होते. धनतेरस (Dhanteras)  किंवा धनत्रयोदशी (Dhantrayodashi) निमित्त अनेक जण काही मौल्यवान वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात. अशामध्ये आता तुम्ही ऑफलाईन खरेदीला बाहेर पडू शकणार नसाल तर ऑनलाईन देखील अनेक पर्याय आहे. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) वर सध्या 'बिग दिवाली सेल' (Big Diwali Sale) सुरू आहे. तर अमेझॉन (Amazon)  कडूनही 'धनतेरस स्टोअर' सुरू करण्यात आलं आहे. मग यामध्ये तुम्ही सोन्या-चांदीच्या खरेदी सोबतच टीव्ही, स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर पहा काय आहेत धमाकेदार ऑफर्स?

अमेझॉन वर सोनं खरेदी

अमेझॉन वर दिवाळी निमित्त तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर डिजिटल गोल्ड वर अमेझॉन कॅशबॅक ऑफर देत आहे. 2 नोव्हेंबर पर्यंत सोनं खरेदी करणार्‍या प्राईम मेंब्सर्सला 5% कॅश बॅक मिळणार आहे. नॉन प्राईम मेंबर्स ना 3% कॅशबॅक मिळेल. पण यासाठी अ‍ॅप वरूनच खरेदी करावी लागणार आहे. अमेझॉनवर गिफ्टचा पर्याय म्हणून गोल्ड व्हाऊचर्स देखील दिले जाऊ शकतात. नक्की वाचा:  Gold Silver Rate Today: धनरेतस पूर्वी आज मुंबई,पुणे ते नागपूर मधील सोन्या-चांदीचे दर पहा किती?

टीव्ही वरील ऑफर्स

Sony Bravia 139 cm (55 inches) – हा 4K Ultra HD Smart LED Google TV with Alexa टीव्ही Rs 77, 990 रूपयांना अमेझॉन वर उपलब्ध आहे. तर फ्लिपकार्ट वर Big Diwali Sale अंतर्गत टेलिव्हिजन वर 75% पर्यंत सूट मिळू शकते.

स्मार्ट फोन

Redmi Note 10 Pro Max अमेझॉन वर Rs 18,999 ला उपलब्ध आहे तर Redmi 9A Rs 6,799 ला उपलब्ध आहे. OnePlus Nord 2 5G हा फोन Rs 29,999 ला उपलब्ध आहे. Apple, Samsung, Xiaomi, Moto च्या स्मार्टफोन वर फ्लिपकार्टच्या बिग दिवाली सेल मध्ये 80% पर्यंत सूट मिळू शकते. मात्र त्यासाठी तुमच्याकडे SBI Bank ची डेबिट, क्रेडीट कार्ड्स असणं आवश्यक आहे. 'No Cost EMI'चा देखील पर्याय उपलब्ध आहे. फ्लिप कार्ट वर मोबाईल फोनच्या खरेदी मध्ये एक्सचेंज ऑफर्सच्या माध्यमातूनही तुम्ही चांगला फोन अपग्रेड करू शकता.

गॅजेट्स

Flipkart कडून हेडफोन आणि स्पिकर्स वर 70% पर्यंत सूट आहे. अमेझॉन वर boAt 100 Wireless Bluetooth in Ear Earphone with Mic अमेझॉन वर Rs 1,199 मिळणार आहेत. Mi Smart Band 5 हे Rs 1,999 ला उपलब्ध आहे. Helix Timex Metalfit SPO2 smartwatch Rs 2,399 ला उपलब्ध असणार आहे.

 

यंदा धनतेरस 2 नोव्हेंबर दिवशी तर दिवाळी पाडवा 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण आहे. या सणांच्या धामधूमीमध्ये आप्तांना गिफ्ट्स देऊन आनंद देण्यासोबतच हा दिवाळीचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.