दिवाळीचा सण म्हणजे सोन्या-चांदीच्या वस्तूंची अवश्य खरेदी केली जाते. दिवाळीच्या दिवसामध्ये धनतेरस (Dhanteras), लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) या शुभ मुहूर्तावर सोन्याची, चांदीची खरेदी केली जाते. मग उद्यावर येऊन ठेपलेल्या धनतेरसच्या मुहूर्ताआधी आज पहा सोन्याचे, चांदीचे नेमके दर किती? भारतामध्ये आज 1 नोव्हेंबर दिवशी सोन्याचे दर स्थिर आहे. दिवाळीच्या धामधुमीतही सध्या सोनं प्रति तोळं 47 हजारांच्या मार्क वर आहे. MCX December वर सोनं 0.12% वाढून 47,691 रूपये झाले आहे. तर चांदीच्या दरात पाचव्या दिवशी कमी झाले आहे. चांदी 0.30% ने कमी झाले असून प्रतिकिलो Rs 64,425 आहे.
सध्या इंटरनॅशनल मार्केट मध्ये सोन्याची किंमत कमी झाली आहे. आज Goodreturns वेबसाईटच्या माहितीनुसार, सोन्याचे दर मुंबई मध्ये 22 कॅरेट्स साठी प्रति ग्राम ₹46,740 आहेत तर 24 कॅरेट साठी ₹47,740 आहेत. पुण्यात हेच दर अनुक्रमे ₹46,050 आणि ₹49,320 आहेत. दिल्लीमध्ये आज सोनं 22 कॅरेट साठी ₹46,850 तर 24 कॅरेटसाठी ₹51,100 आहे. नागपूर मध्ये ₹46,740 किंमत 22 कॅरेटसाठी तर ₹47,740 24 कॅरेटसाठी मोजावे लागेत. नक्की वाचा: धनतेरसला सोनं खरेदी करताय? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी.
10 वर्षांपूर्वी धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या सोन्याने आत्तापर्यंत 6.56% वार्षिक परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षात कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स (CII) मध्ये 5.6% च्या वार्षिक वाढीपेक्षा हे जास्त आहे. आता सोनं खरेदीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोनं खरेदीसाठी आता डिजिटल गोल्डचा पर्याय आहे. गोल्ड बॉन्ड्स देखील खरेदी केली जातात. सोन्यातील गुंतवणूकीचा तो एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी आरबीआय कडून खास बॉन्ड्स जारी केले जातात. दरम्यान फिजिकल सोनं खरेदीसाठी देखील दागिन्यांसोबत वळं, बिस्कीट, नाणं खरेदी करून ते सोयीनुसार वापरलं जाऊ शकतं.