Cryptocurrency Blockchain Nodes: क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन नोड कसे काम करते? जाणून घ्या नेटवर्कविषयी
Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

'क्रिप्टोकरन्सी' (Cryptocurrency), 'बिटकॉईन' (Bitcoin), 'डॉजकॉईन' (Dogecoin) हे शब्द नव्या अर्थव्यवस्थेत नव्याने घेतले जाऊ लागले आहेत. रुढ अर्थव्यवस्थेत या शब्दांना अद्यापही अपवाद वगळता मान्यता नाही. त्यामुळे आजही अनेकांना 'क्रिप्टोकरन्सी', 'ब्लॉकचेन नोड' (Blockchain Node) प्रणाली यांबद्दल म्हणावी तितकी माहिती नाही. क्रिप्टोकरन्सीमध्ये महत्त्वपूर्ण मानली जाणारी 'ब्लॉकचेन टेक्नोलॉजी' (Blockchain Technology) म्हणजे सरळ सरळ एक 'डिसेंट्रलाइज्ड लेजर' (Distributed Ledger) म्हणजेच विकेंद्रीत, कोणाचेही नियंत्रण नसेलेली अनियंत्रीत , सार्वजनिक खातेबूक किंवा नेटवर्क आहे. ज्यावर 'क्रिप्टोकरन्सी ट्रांजेक्शन' (Cryptocurrency Transactions) केले जाते. क्रिप्टोकरन्सीमध्ये 'इको सिस्टम' मध्ये 'ब्लॉकचेन नोड' हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

'क्रिप्टोकरन्सी' ही एक पूर्णपणे 'व्हर्च्युअल करन्सी'

'क्रिप्टोकरन्सी' ही एक पूर्णपणे 'व्हर्च्युअल करन्सी' आहे. क्रिप्टोरन्सीत 'नोड' ही एक प्रणाली आहे. व्हर्च्युअल करन्सीत संगणक म्हणजेच कॉम्प्यूटरला 'नोड' म्हटले जाते. जो क्रिप्टोकरन्सी नेटवर्कशी जोडला गेलेला असतो. क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर लक्ष ठेवणे आणि माहितीचा साठा करणे हे एकमेव काम या नोडकडे असते. माहितीचे आदान-प्रदानही हा नोड करत असतो. समजा एखाद्या रिजेंट नेटवर्कवर एक फाईल सर्वर आहे. यात तीन लॅपटॉप आणि एक फॅक्स मशीन कनेक्टेड आहे. तर याचा अर्थ असा की या नेटवर्क सिस्टममध्ये पाच नोड काम करत आहेत. त्यामुळे या सर्व पाचही नोडचा मिळून एक MAC एड्रेस तयार होतो. हा एॅड्रेसच या नोडची ओळख असते. (हेही वाच, Cryptocurrency Dogecoin: क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइन बाबत तुम्हाला माहिती आहे काय? घ्या जाणून)

बॉकचेनमध्ये नोड कसे काम करतो?

आपणास माहिती आहेच की, 'ब्लॉकचेन' ही एक ऑनलाईन प्रकारचे सार्वजनिक खातेपुस्त असते. ज्याद्वारे क्रिप्टो ट्रांजेक्शन्स (व्यवहारांची नोंद) नोंदवले जातात. ब्लॉकचेन या व्यवहारांचा रेकॉर्डेड डेटा कनेक्टेड डिवाईसच्या माध्यमातून माहितीच्या रुपात दर्शवते. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यवहाराचे क्रोनोलॉजिकली रिकॉर्ड तयार होते. तसेच हे रेकॉर्ड बॉकचेन स्वासोबत जोडलेल्या इतर डिवाइससोबत वितरीत करते. या डिवाईसलाच नोड्स म्हटले जाते. हे नोड्स नेटवर्कमध्ये असलेल्या एकमेकांशी सतत संपर्कात असते. तसेच, ट्रांजेक्शन आणि नवे ब्लॉक्स एमकेकांशी माहितीची देवाणघेवाण करत राहता. (हेही वाचा, Cryptocurrency: अमिताभ बच्चन लॉन्च करणार NFT कलेक्शन, Digital Asset Business द्वारा नव्या क्षेत्रात पदार्पण)

Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

नोड्सचे प्रकार आणि कार्य

सामान्यत: नोड्सचे दोन प्रकार असतात. एक 'फुल नोड्स' आणि दुसरा म्हणजे 'लाइटवेट नोड्स'. ब्लॉकचेन नोडचे प्रमुख कार्य म्हणजे नेटवर्कमध्ये होत असलेले व्यवहार तपासून घेणे. प्रत्येक नोडचा एक वेगळा यूनीक आयडी असतो. ज्याद्वारे त्याला ओळख मिळते. इतरही प्रकारचे नोड्स असतात.

फुल नोड्स - नेटवर्क सपोर्ट आणि सुरक्षितता देण्याचे काम करतो. या प्रकारातील नोड्स हे संपूर्ण ब्लॉकचेन सिस्टममधील संपूर्ण हिस्ट्री डाऊनलोड करतात आणि त्यांच्या नियमांना समजून पुन्हा लागू करतात.

लाइटवेट नोड- नेटवर्कमध्ये प्रत्येक यूजरला लाइटवेट नोड म्हटले जाते. नोडला फक्शन करण्यासाठी एखाद्या फूल नोडची आवश्यकता असते. जी लाइटवेट नोड नेटवर्क पूर्ण करते.

Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

दरम्यान, फुल नोड्स आणि दुसरा म्हणजे लाइटवेट नोड्स यांच्यप्रमाणेच इनर नोड, 'लिसनिंग नोड्स' (सुपरनोड्स) असे इतरही काही विविध नोड्स असतात. 'मायनर नोड' हे 'बिटकॉइन माइनर्स' टर्म नोड्स प्रकारात येतात. जे एकटे आणि ग्रुपमध्येही काम करु शकतात. इतकेच की इनर नोड एडमिनिस्ट्रेटर च तो यूज करु शकतो. लिसनिंग नोड्स (सुपरनोड्स) ही आणखी एक सब कॅटेगरी म्हणून ओळखली जाते. हा नोड पब्लिकली विजिबल फुल नोड आहे. कोणीही या नोडला कम्युनिकेट करु शकतो.

महत्त्वाची टीप: वरील माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन अथवा तत्सम प्रकारच्या गुंतवणुकीबाबत सुरक्षेची कोणतीही हमी लेटेस्टली मराठी देत अथवा घेत नाही. वाचकांनी ही माहिती वाचल्यावर स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील जोखीम, फायदा-तोटा सुरक्षीतता याचा अभ्यास करुन व तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा.