Cryptocurrency: अमिताभ बच्चन लॉन्च करणार NFT कलेक्शन,  Digital Asset Business  द्वारा नव्या क्षेत्रात पदार्पण
Amitabh Bachchan | Photo Credits: Facebook)

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) हे आता डिजिटल एसेट व्यवसायात (Business) पदार्पण करत आहेत. येत्या नोव्हेंबर 2020 मध्ये बच्चन हे आपले NFT (non-fungible tokens) लॉन्च करत आहे. या माध्यमातून ते डिजिटल अॅसेट व्यवसायात (Digital Asset Business) उतरणारे पहिलेच भारतीय अभिनेते असतील. जगभरात जवळपास 2.5 अब्ज डॉलर्सची एनएफटी विक्री झाली आहे. एनएफटी म्हणजे काय? (What Is NFT ) हा सवाल अनेकांच्या मनात निर्माण होतो. म्हणूनच थोडक्यात जाणून घ्या NFT आहे तरी काय?

एनएफटी हे क्रिप्टोकरन्सी प्रमाणेच एक डिजिटल अॅसेट असते. ज्याची विक्री आणि खरेदी ऑनलाईन पद्धतीनेच केली जाते. यात साहित्य, मनोरंजन, कला, खेळ (ऑनलाईन) अशा विविध प्रकारांचा ऑनलाईन व्यापार होतो. यात क्रिप्टो प्रमाणेच ब्लॉकचेन सॉफ्टवेअर वापरले जाते. एनएफटीची विक्री करण्यासाठी लागणारी रक्कमही क्रिप्टोकरन्सीच्या रुपात दिली जाते. (हेही वाचा, Cryptocurrency Dogecoin: क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइन बाबत तुम्हाला माहिती आहे काय? घ्या जाणून)

अमिताभ बच्चन हे ज्या प्रकारची एनएफटी लॉन्च करत आहेत त्यात लिमिटेड आर्टवर्कचे यूनीक कलेक्शन असणार आहे. यात त्यांचे विशेष दस्तऐवज असलेले शोलेचे पोस्टर्स, त्यांच्याद्वारे वाचल्या गेलेल्या 'मधुशाला' काव्यसंग्रहातील कविता आणि इतर काही युनिक गोष्टी असणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की, हे कलेक्शन Rhiti एंटरटेनमेंट आणि नो कोड एनएफटी एक्सचेंज प्लेटफॉर्म GuardianLink सोबत पार्टनरशिपमध्ये लॉन्च करण्यात येईल. बच्चन यांनी या पार्टनरशिपबद्दल बोलताना सांगितले की, मी Rhiti एंटरटेनमेंट सिंगापुर ला जॉईन केले आहे आणि मी लवकरच या प्लॅटफॉरमवर NFT लॉन्च करेन.

या प्लॅटफॉर्मवर डिजिटल अॅसेटची विक्री नोव्हेंबरपासून सुरु होईल. या अॅसेटची खरेदीसाठी BeyondLife.Club वर लॉग इन करावे लागेल. यात एसेटचा लिलाव केला जाईल. नंतर आपल्या जवळ प्राप्त असलेल्या अॅसेटची याच प्लॅटफॉर्मवर विक्रीही करता येईल. त्यासाठी क्रेडीट अथवा डेबिट कार्टवरुन पेमेंट केले जाईल.