Cryptocurrency Dogecoin: क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइन बाबत तुम्हाला माहिती आहे काय? घ्या जाणून
Dogecoin | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency ) म्हणून साधारण 2013 मध्ये शीबा इनू (Shiba Inu) प्रजातीच्या कुत्र्याच्या चेहऱ्याची प्रतिमा वापरून एखाद्या मीमच्या धर्तीवर डॉजकॉइन (Dogecoin) लॉन्च झाला. जो आज क्रिप्टोकरन्सी विश्वात स्वतंत्र अस्तित्व बाळगून आहे. केवळ स्वतंत्र अस्तित्वच नव्हे तर लोकप्रियता आणि मूल्याच्या बाबतीतही डॉजकॉईन (Shiba Inu Coin) अव्वल ठरतानाच दिसतो आहे. किमतीच्या बाबतीत क्रिप्टोकरन्सीत डॉजकॉईन (Dogecoin Price) सर्वाधिक ट्रेण्ड करणारी क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सी विश्वात अव्वल ठरलेल्या डॉजकाईन बाबत आपल्याला माहिती (Dogecoin

डॉजकॉइन निर्मिती (Dogecoin creator)

सॉफ्टवेअर इंजीनिअर बिली मार्क्स (Billy Markus) आणि जॅक्सन पामर (Jackson Palmer) या दोघांनी डॉजकॉइन निर्मिती केली. डॉजकॉइन एक क्रिप्टोकरन्सी आहे. ज्या गुंतवणूक प्रणाली निर्मीती करण्यात आली आहे. परंपरीक आणि अपारंपरीक अशा प्रकारे होणारी ही गुंतवणूक तार्कीक आधाराव केली जाते. सुरुवातीला डॉजकॉईन हा एक मिम्सच्या रुपात दर्शविण्यात आला. ज्यात 'शीबा इनू' कुत्र्याचा चेहरा पाहायला मिळतो. 6 डिसेंबर 2013 मध्ये प्रथम डॉजकॉईन लॉन्च करण्यात आला आणि 28 जानेवारी 2021 ला 5,38,28,75,000 अमेरिकी डॉलरच्या बाजारात गुंतवणूकदारापर्यंत पोहोचण्यात या क्रिप्टोकरन्सीने मजल मारली.

Dogecoin | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

गुंतवणुकदाराकडे DOGE कॉईन 

मानले जाते की आजही या व्हर्च्युअल करन्सीचा एक मोठा हिस्सा काही लोकांच्याच हातात आहे. 106 बिलियन DOGE कॉईन म्हणजेच संपूर्ण पुरवठा केवळ 82% ब्लॉकचेनवर म्हणजेच 535 गुंतवणुकदारांच्या हातात आहे. यात प्रत्येक गुंतवणुकदाराकडे 10-10 मनिलीयन म्हणजे DOGE कॉईन आहेत.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांचे विशेष लक्ष्य

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk on Dogecoin) आणि रेडिटने पाठिमागील सहा महिन्यांपासून या क्रिप्टोकरन्सीवर फोकस करण्यास सुरुवात केली. यात जर सहा महिन्यांची आकडेवारी पाहिली तर त्यात बऱ्याच मजेशीर गोष्टी समोर येतात. पाठिमागील सहा महिन्यांमध्ये ज्या गुंतवणुकदारांनी DOGE मध्ये गुंतवणूक केली आहे ते आता या करन्सीत सुमारे 25 टक्के भागावर अधिकार ठेऊन आहेत.

किंमत सातत्याने वाढत आहे

मार्केट इंटेलीजेंस फर्म Chainalysis च्या एका अहवालानुसार जेव्हापासून मस्क आणि रेडीट यांनी आपले लक्ष्य डॉजकॉईनवर केंद्रीत केले आहे तेव्हापासून त्याची किंमत सातत्याने वाढत आहे. या रिपोर्टमध्ये Chainalysis चे म्हणने असे की, ज्या पातळिवर गुंतवणुकदार या टोकनची खरेदी करत आहेत तशा प्रकारचा ट्रेंण्ड 2017 च्या शेवटच्या काही महिन्यांनंतर पाहायला मिळाला नव्हता. जुलै 2020 मध्ये DOGE चे जे गुंतवणुकदार होते त्याच्या जवळ टोकनच्या सप्लायचा जवळपास 9% हिस्सा होता. परंतू, ऑगस्ट 2021 मध्ये नव्य गुंतवणुकदारांजवळ त्याच्या 25% हिस्सा झाला आहे.

Dogecoin | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

दरम्यन, डॉजकॉईनचे सुमारे 4 मिलियन ऑन-चेन होल्डर्स आहेत. त्यामध्ये काही मोजक्या संख्येत असे आहेत ज्यांच्या जवळ या क्रिप्टोकरन्सीचा मोठा हिस्सा आहे. Chainalysis चे म्हणने असे की, या 535 गुंतवणुकदारांमध्ये अधिक बिझनेस आणि एक्स्चेंज होऊ शकते. अशात एक्चेंज दोन ट्रेडर्ससाठी DOGE टोकन खरेदी करतात. बाकी काही श्रीमंत गुंतवणुकदार अशू शकतात. दरम्यान, सुमारे सप्लायच्या 82% शेअर असणाऱ्यांपैकी या 535 अकाऊंट्समध्ये कमीत कमी 31 गुंतवणूकदार असे आहेत ज्यांच्या जवळ 37 बिलियन DOGE कॉईन आहेत. आणि त्यांना या कॉइन्समध्ये 6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंच्या कालावधीत गुंतवणुक केली आहे.

दरम्यान, इतर गुंतवणुकदारांमध्ये 4 मिलियन गुंतवणुकदारांपैकी 2.1 मिलियन गुंतवणुकदारांजवळ 100 पेक्षाही कमी DOGE आहेत. म्हणजेच 2.1 मिलियन गुंतवणुकदारांपैकी प्रत्येक गुंतवणुकदाराकडे 100 पेक्षाहीकमी डॉजकॉईन आहेत. यात अधिक गुंतवणुकदारांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुक केली आहे.

महत्त्वाची टीप: वरील माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन अथवा तत्सम प्रकारच्या गुंतवणुकीबाबत सुरक्षेची कोणतीही हमी लेटेस्टली मराठी देत अथवा घेत नाही. वाचकांनी ही माहिती वाचल्यावर स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील जोखीम, फायदा-तोटा सुरक्षीतता याचा अभ्यास करुन व तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा.