
कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. जगभरातील 170 हून अधिक देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहेत. यातच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने (Facebook) महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॅलिफोर्नियामध्ये जंगलात सतत भीषण आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीसाठी फेसबुकने 7 लाख 20 हजार फेस मास्कचा (Face Mask) साठा ठेवला होता. आपल्याकडील आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलेल्या हा साठा फेसबूक दान करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय टेक कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनीही फेस मास्क दान करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ते वाहतुकीत अडकून पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 400 च्या वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून राज्य सरकारकडून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रकारची वाहतूक आज दुपारी 3 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: 'जनता कर्फ्यू' असतानाही पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं धुमधडाक्यात लग्न; औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सुल येथील प्रकार
करोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या देशांतून परतणाऱ्या नागरिकांना निगराणी कक्षात आणि होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येत असून त्यांना घरातून बाहेर फिरण्यास बंदी केलेली आहे. तरी देखील काही नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहेत.