औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सुल (Harsul) येथील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) 'जनता कर्फ्यू' (Janata Curfew) असताना देखील आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावले आहे. या लग्नाला जवळपास एक हजार वऱ्हाडी उपस्थित राहिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राज्यासरह देशभरात कोरना व्हायरस (Coronavirus) संकटाची पार्श्वभूमी आहे. असे असूनही अधिकाऱ्याने हे धोका पत्करला आहे. या अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होणर. तसेच, मंगल कार्यालय मालक, नवरा नवरीचे आई-वडील त्यांचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल होणार का याबात उत्सुकता आहे.
कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध आघाड्यांवर प्रयत्न करत आहे. राज्यात तर लॉकडाऊन स्थिती आहे. जमावबंदी आदेशही दिले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे अवाहन केले. ज्याला अवघ्या देशाने पाठिंबा दिला. असे असताना पोलीस सेवेत असलेल्या या अधिकाऱ्याने मुलीच्या लग्नाचा बार उडवून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा पोलीस अधिकारी पोलीस सवेवेतील कोणी लहानसहान अधिकारी नव्हे तर चांगला वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती मिळते आहे.
कोरोना व्हायरस संकटाने जगभरात गाटलेले टोक पाहता त्याकडे आता एक स्वतंत्र अभ्यास म्हणून पाहिले जात आहे. हा अभ्यास जगभरातील इतर देश सुरक्षेसाठी विचारात घेत आहेत. भारतानेही जर्मनी, इटली, स्पेन आणि अमेरिका, चीन या देशांचा अभ्यास करुन कोरोना व्हायरस संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. (हेही वाचा, Coronavirus: लॉकडाऊन काळात काय करावे, करु नये? या महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत काय?)
जगभरातील कोरोना पीडित देश. ज्यांना कोरोना व्हायरसचा तडाखा अत्यंत वाईटरित्या बसला आहे. असे देश जगभरातील इतर देशांना सांगत आहेत की काहीही करा गर्दी नियंत्रणात ठेवा. भारत आणि महाराष्ट्रातही गर्दी टाळण्याचे प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात जमावबंदी आदेश आहे. मुंबई, पुणे ही शहरं तर लॉकडाऊन आहेत. अशा स्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणावर लग्न आयोजित करणे आणि सुमारे हजाराराच्या घरात वऱ्हाडी बोलावणे हे धक्कादायक मानले जात आहे.