Images of craters captured by Chandrayaan 2 (Photo Credits: Twitter/ISRO)

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (ISRO) सोमवारी चंद्राच्या आणखी काही प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रतिमा इस्रोच्या चांद्रयान 2 (Chandrayaan 2) या यानातील Terrain Mapping Camera-2 (TMC-2) ने क्लिक केल्या आहेत. या प्रतिमांमध्ये चंद्रावरील प्रभाव (Impact Crater) आपल्याला दिसून येत आहेत. या विविध क्रेटर्सना जॅक्सन, माच, कोरोलेव्ह आणि मित्रा (प्रा. सिसिर कुमार मित्रा यांच्या नावावरून) अशी नावे देण्यात आली आहेत. चंद्रापासून 4375 किलोमीटर अंतरावरून, 23 ऑगस्ट रोजी ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत.  इस्रोने ट्विट करत या प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत.

इस्रो ट्विट -

सोलर सिस्टीममधील अनेक ग्रहांवर, उपग्रहांवर हायपरवेलिटी प्रभावामुळे पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांना Impact Crater असे म्हणतात. जॅक्सन हा चंद्राच्या अगदी उत्तरेकडील गोलार्धात स्थित एक प्रभाव आहे. सॉमरफेल्ड हा चंद्राच्या उत्तरेकडील अक्षांशात स्थित एक मोठा प्रभाव आहे. हा 65.2 डिग्री उत्तरेस आणि 162.4 डिग्री वेस्टवर 169 कि.मी. व्यासाचा क्रेटर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या या क्रेटर्सपैकी काही क्रेटर्स हे 50 हजार वर्षे जुने आहेत. तर काही 500 किमी व्यासाचे आहेत. (हेही वाचा: Chandrayaan 2 Sents Image Of Moon: चांद्रयान 2 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो; जरा निरखूनच पाहा)

दरम्यान, इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी मंगळवारी, चंद्रयान -2 च्या चंद्र कक्षाच्या यशस्वी समाप्तीची घोषणा केली. 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्रावर हळूवारपणे लँडिंग करेल असेही ते म्हणाले. चांद्रयान 2 ही भारताच्या चांद्र मोहिमेचा दुसरा टप्पा आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेन. चांद्रायन 2 च्या माध्यमातून चंद्र या उपग्रहाबाबत असलेल्या अनेक रहस्यांचा उलघडा होणार आहे. चांद्रयान 2 चे लॅन्डर 7 सप्टेंबर 2019 च्या रात्री 1 वाजून 55 वाजता चंद्रावर उतरणार आहे.